रक्तदात्यांचा एक लाख रुपयांचा अपघाती विमा

पाथर्डीतील सुवर्णयुग तरुण मंडळाचा उपक्रम

पाथर्डी – शहरातील सुवर्णयुग तरुण मंडळाने रक्तदान शिबिराचा आगळावेगळा उपक्रम राबवत रक्तदान करणाऱ्या रक्तदात्यांचा प्रत्येकी एक लाख रुपयांचा अपघाती विमा काढला. राज्यात हा पहिलाच उपक्रम आहे. नवनवीन वेगवेगळ्या संकल्पना घेऊन मंडळ प्रत्येक क्षेत्रात जनजागृती करून समाजकार्याची बांधिलकी जपत आहे .
या रक्तदान शिबीराचे उद्घाटन पोलीस निरीक्षक रमेश रत्नपारखी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी नगरसेवक नामदेव लबडे, डॉ अभय भंडारी, अँड बर्डे, जनकल्याण रक्त पेढीचे डॉ. वसंत झेंडे, डॉ विलास मढीकर, मंडळाचे मार्गदर्शक राजेंद्र शेवाळे, उत्सव समिती अध्यक्ष गणेश महालकर, अँड प्रतिक खेडकर, सतिश टाक आदी मान्यवर उपस्थित होते .
रक्तदान शिबिरात सुमारे 43 पिशव्या संकलित करण्यात आल्या. या 43 जणांचा प्रत्येकी एक लाखांचा असा एकूण सुमारे 43 लाखांचा अपघाती विमा काढण्यात आला. गणेश उत्सवामधील 10 दिवसांच्या कालावधीत नागरिकांत जास्तीत जास्त कसे प्रबोधन करता येईल, यासाठी मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते प्रयत्नशील असतात. यावेळी बोलतांना पोलीस निरीक्षक म्हणाले, की शहराची सुरक्षा, पर्यावरण, स्वछता या बाबी अतिशय महत्वाच्या असून शहरातील सुरक्षेच्या दृष्टीने तालुक्‍यातील देवस्थाने, विविध सामाजिक संस्था यांच्या पुढाकाराने पाथर्डीसह तालुक्‍यातील मोठ्या गावांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवणार आहे. या सामाजिक कार्यात गणेश मंडळांनी सहभागी होण्याचे आवाहन रत्नपारखी यांनी केले . मुकुंद लोहिया यांनी प्रास्ताविक, अजय भंडारी यांनी सूत्रसंचालन केले. मंडळाचे अध्यक्ष वैभव शेवाळे यांनी आभार मानले .


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)