रंग काम करणाऱ्या मजूराचा पडून मृत्यू

Silhouette of the dead man painted on the ground, vector background

 कंत्राटदाराविरोधात गुन्हा दाखल

पिंपरी – इमारतीचे उंचीवर रंगकाम करत असताना 25 फूटांवरुन पडून मजुराचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ही घटना 29 ऑगस्ट रोजी दुपारी दोन वाजता ऍव्हेन्यू बांधकाम साईट, वाकड येथे घडली. या प्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात कंत्राटदारा विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

इकबाल शेख असे मयताचे नाव असून याप्रकरणी विशाल श्रावण कांबळे (वय-21 रा. वाकड) यांनी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार जितेंद्र ओमप्रकाश झंझोटर (वय-38 रा. मामुर्डी, देहुरोड) याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, इकबाल हा इमारतीच्या दुसऱ्या मजल्याच्या गॅलरीला रंगकाम करत असताना त्याचा तोल गोला व 25 फूटावरुन खाली पजडला. यामध्ये त्याचा जागीच मृत्यू झाला. मात्र यावेळी कंत्राटदाराने मदुराच्या सुरक्षिततेची कोणतही काळजी न घेतल्यामुळे हा अपघात घडली. याप्रकरणी कंत्राटदारावर गुन्हा दाखल केला असून, पोलीस पुढील तपास करत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)