“रंगीला राजा’वर सेन्सॉरची कात्री 

पहलाज निहलानींची न्यायालयीन फरफट सुरूच

याचिकेची सुनावणी 28 नोव्हेंबरला 

मुंबई –
 “रंगीला राजा’ चित्रपटातील दृष्ये वगळल्याप्रकरणी सेन्सॉर बोर्डाविरोधात हायकोर्टात धाव घेणाऱ्या चित्रपट निर्माता पहलाज निहलानी याची न्यायालयीन फरफट अजून काही संपलेली नाही. न्यायालयाने याचिकेची सुनावणी 28 नोंव्हेबरपर्यंत तहकूब ठेवली. त्यामुळे त्यांच्या आगामी “रंगीला राजा’चे प्रदर्शन आणखीन लांबण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे.

अभिनेता गोविंदा याची मुख्य भूमिका असलेल्या “रंगीला राजा’ या चित्रपटातील सुमारे 20 दृष्ये वगळण्याच्या सेंसॉर बोर्डाच्या निर्णयाविरोधात पहलाज निहलानी यांनी उच्च न्यायालयात धाव घेऊन याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर न्यायमूर्ती बी. पी. धर्माधिकारी आणि न्यायमूर्ती सारंग कोतवाल यांच्या खंडपीठासमोर आज सुनावणी झाली. त्यावेळी याचिकाकर्त्यांच्या वतीने सेन्सॉर बोर्डाच्या निर्णयाविरोधात चित्रपट प्रमाणपत्र अपिलीय लवादाकडे दाद मागितली असून त्यावर 23 नोव्हेंबरला त्यावर सुनावणी असल्याची माहिती न्यायालयाला दिली. याची दखल घेऊन न्यायालयाने याचिकेची सुनावणी 28 नोव्हेंबरपर्यंत तहकूब ठेवली.


-Ads-

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)