रंगीबेरंगी कॉन्टॅक्‍ट लेन्स

डोळे हा सौंदर्याचा अविभाज्य घटक. डोळ्यातून आपले भाव, स्वभाव, आनंद व्यक्त व्हावेत अशी प्रत्येकाचीच इच्छा असते. कोणा युवतीला आपले डोळे घारे असावेसे वाटतात तर कोणा युवतीला पिंगट, हिरवे असावेसे वाटतात. अशा आवडींसाठी कॉन्टॅक्‍ट लेन्सचे जग समोर आहे. आजकाल कॉन्टॅक्‍ट लेन्सच्या मदतीने डोळ्यांना आपल्या पसंतीचा रंग व सौंदर्य देता येते.

वैज्ञानिक प्रगतीबरोबर कॉन्टॅक्‍ट लेन्सचा आकार लहान करण्यात आला. त्यांची उपयुक्तता आणि गुप्तता वाढवण्यात आलीय. या लेन्सच्या रंग व रेन्जमध्ये वाढ झाली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

चेहऱ्याचं सौंदर्य वाढवणाऱ्या आणि चेहरा आकर्षक बनवणाऱ्या कॉन्टॅक्‍ट लेन्सचा वापर प्रथम फक्त सिनेकलावंत, एअरहोस्टेस व रिसेप्शनिस्ट वगैरे मंडळीच करत होती. परंतु आज अधिक प्रमाणात लोक या लेन्सचा वापर करू इच्छितात, जेणेकरून त्यांचं व्यक्तिमत्त्व उठून दिसेल. आज बाजारामध्ये तीन प्रकारच्या कॉन्टॅक्‍ट लेन्स आहेत- सॉफ्टस, सेमी सॉफ्ट आणि हार्ड. या लेन्स वेगवेगळ्या रंगांमध्ये उपलब्ध आहेत. सॉफ्ट व सेमी सॉफ्ट लेन्सचा वापर अधिक प्रमाणात केला जातो. यांचा वापर करणं अधिक सोयीस्कर ठरतं.

निळ्या रंगाच्या कॉन्टॅक्‍ट लेन्समुळे चेहरा मादक व प्रभावी दिसतो. वाईल्ड ब्राऊन कॉन्टॅक्‍ट लेन्स शालीनता व खट्याळपणा दर्शवतात. ड्रीप ब्लॅक कॉन्टॅक्‍ट लेन्समुळे तुमच्या व्यक्तिमत्त्वाला एक प्रकारचा गुढपणा येतो.

कॉन्टॅक्‍ट लेन्सच्या जगतामध्ये अदभूत रंग आणि रहस्यमय सौंदर्याचा खजिना आहे. आपल्याला आवडीच्या रंगाच्या कॉन्टॅक्‍ट लेन्सची निवड करता येऊ शकते. कॉन्टॅक्‍ट लेन्सचा वापर करताना तुमचा मेकअप असा असावा, ज्यामुळे तुमच्यामध्ये स्वातंत्र्य आणि आत्मविश्वासाची भावना निर्माण झाली पाहिजे. कॉन्टॅकक्‍ट लेन्स लावलेल्या असताना केलेल्या योग्य मेकअपमुळे चेहऱ्याला एक वेगळंच आकर्षण येतं.

त्वचेचा रंग आणि नैसर्गिक रंग लक्षात घेऊन तयार केलेल्या कॉन्टॅक्‍ट लेन्स सर्वात चांगल्या असतात. चांगले परिणाम व डोळ्यांच्या सौंदर्यासाठी त्याच लेन्सचा वापर करा ज्यात डोळे, व त्वचेच्या रंगाला अनुरूप असतील. त्यामुळे डोळ्यांचा रंग अधिक नैसर्गिक दिसेल.

डिस्पोजेबल लेन्स वेगवेगळ्या प्रकारच्या रंग व छटांमध्ये उपलब्ध आहेत. त्यामुळे तुमच्या व्यक्तिमत्त्वाला एक वेगळाच लुक येतो.

जर तुमच्या डोळ्यांचा रंग फिकट असेल तर सेमी ट्रान्सपरन्ट लेन्स घ्या. तुम्ही अशा रंगाच्या लेन्सचीसुद्धा निवड करू शकता जी तुमच्या डोळ्यांच्या रंगाहून अगदी निराळी असेल; परंतु डोळ्यांमध्ये अधिक प्रभावी बदल करून आणेल.

कॉन्टॅक्‍ट लेन्सच्या अशा रंगाची निवड करा, जो तुमचा मूड, कपड्यांचा रंग, केसांचा रंग आणि त्वचेच्या रंगाला अनुरूप असेल. नेहमी प्रसंगानुसारच लेन्सचा वापर करा. उदाहरणार्थ, सकाळी व संध्याकाळी फिकट रंगाच्या लेन्सचा वापर करा आणि रात्रीच्या वेळी गडद व गूढ रंगाच्या लेन्सचा वापर करा.

– सुजाता टिकेकर


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)