रंगीत ज्वारी वाण विकसीत होणे गरजेचे

डॉ. आय. एस. सोळंकी : ज्वारी सुधार प्रकल्पाची 48 वी वार्षिक आढावा बैठक
राहुरी विद्यापीठ – ज्वारीचे औषधी गुणधर्म बघता ज्वारी आणि ज्वारीच्या प्रक्रिया पदार्थांना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मोठी मागणी आहे. यासाठी ज्वारीचे पदार्थ बनविण्याचे प्रशिक्षण, प्रचार आणि प्रसार होणे गरजेचे आहे. ज्वारीला चायना आणि इतर देशात मोठी बाजारपेठ आहे. परंतु भारतातील उत्पादीत ज्वारी भारतामध्येच पुरत नाही. यासाठी देशामध्ये ज्वारी खालील क्षेत्र आणि उत्पादकता वाढविणे गरजेचे आहे. निर्यातक्षम ज्वारी निर्मितीसाठी रंगीत ज्वारीचे वाण विकसीत होणे गरजेचे आह, असे प्रतिपादन सहाय्यक महासंचालक डॉ. आय. एस. सोळंकी यांनी केले.
महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी आणि भारतीय कृषी अनुसंधान परिषदेचे मिलेटस्‌ संशोधन संस्था, राजेंद्रनगर, हैद्राबाद यांच्या संयुक्‍त विद्यमाने अखिल भारतीय समन्वीत ज्वारी सुधार प्रकल्पाच्या 48 व्या वार्षिक आढावा बैठकीचे उद्‌घाटन नवी दिल्ली येथील भारतीय कृषी अनुसंधान परिषदेचे साहायक महासंचालक (चारा पीके) डॉ. आय. एस. सोळंकी यांच्या हस्ते झाले. बैठकीच्या अध्यक्षस्थानी महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे अधिष्ठाता डॉ. अशोक फरांदे होते.
याप्रसंगी व्यासपीठावर भाकृअप, मिलेटस्‌ संशोधन संस्था राजेंद्रनगर, हैद्राबादचे संचालक, डॉ. विलास टोनापी, बंगळुरू येथील प्रकल्प समन्वयक डॉ. प्रभाकर, सहयोगी अधिष्ठाता (पम) डॉ. जे. व्ही. पाटील, वरीष्ठ ज्वारी पैदासकार डॉ. अशोक जाधव उपस्थित होते.
अधिष्ठाता डॉ. अशोक फरांदे म्हणाले, बदलत्या हवामानात आणि दुष्काळ परिस्थितीत चांगले उत्पादन देण्याची क्षमता ज्वारीमध्ये आहे. ज्वारी हे कोरडवाहू भागातील शेतकऱ्यांसाठी एक अमुल्य भेट आहे. इथेनॉल निर्मितीसाठी गोड ज्वारीवर अधिक संशोधन होणे गरजेचे आहे. ज्वारी काढणीसाठी यांत्रिकीकरणावर अधिक संशोधन होणे आवश्‍यक आहे.
याप्रसंगी संचालक डॉ. विलास टोनापी यांनी ज्वारी उत्पादनात, ज्वारी संशोधन, ज्वारी प्रक्रियावर जगाची आणि आपल्या देशाच्या स्थितीबद्‌दल सादरीकरण केले. यावेळी डॉ. प्रभाकर आणि डॉ. जे. व्ही. पाटील यांनी मनोगत व्यक्‍त केले. याप्रसंगी ज्वारीवरील विविध प्रकाशनांचे मान्येवरांच्या हस्ते विमोचन करण्यात आहे. यावेळी ज्वारी, नागली, वरई या धाण्यांपासून विविध प्रक्रिया पदार्थांचे प्रदर्शन मांडण्यात आले होते. बैठकीला देशभरातून 150 हून अधिक शास्त्रज्ञ सहभागी झाले आहेत. सूत्रसंचालन डॉ. एच. एस. तलवार यांनी केले.डॉ. अशोक जाधव यांनी आभार मानले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)