रँचो वॉल पाडण्याचा निर्णय ; पर्यटकांवरही बंदी

आमिर खानच्या ‘3 इडियट्स’ चित्रपटात दाखवलेल्या ‘रँचो वॉल ‘ येथे पर्यटकांच्या प्रवेशावर बंदी घालण्याचे ठरविले आहे. तसेच वॉल पाडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. द्रुक पद्म कार्पो स्कूलमधील विद्यार्थ्यांना पर्यटकांमुळे अडचण निर्माण झाली होती त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला.

चित्रपटात चतुर नावाच्या पात्राने या भिंतीवर लघुशंका करत असताना आमिर खान (रँचो) याने कॉलेजच्या दिवसांमध्ये तयार केलेले ‘करंट देणारे मशीन वापरून त्या शाळेतील लहान विद्यार्थी चतुरला उघड्यावर लघुशंका केल्याची शिक्षा देतात.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

“या चित्रपटाद्वारे या शाळेची भरपूर प्रसिद्धी झाली आणि शाळेला भेट देणाऱ्या पर्यटकांची गर्दी वाढली. मात्र शाळा प्रशासनाने विद्यार्थ्यांचे लक्ष विचलित होत असल्यामुळे पर्यटनास बंदी घातली आहे. शाळेच्या मुख्यध्यापकांनी ही माहिती दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)