पुणे: दिल्ली येथे झालेल्या कीकबॉक्सिंग फेडरेशन ऑफ इंडिया च्या राष्ट्रीय कीकबॉक्सिंग चॅम्पियनशीप मध्ये महाराष्ट्र टीम मधून योद्धा मार्शल आर्टसच्या विद्यार्थिनींनी घवघवीत यश संपादन केले.

यामध्ये 11 ते 13 वयोगटात 37 कीलो   वजनगटात सेमी कॉन्टॅक्ट मध्ये नीरजा कुर्रा हिने अंतिम फेरीत हरियानाची नेहा हिच्यावर मात करून सुवर्ण पदक जिंकले.

तसेच 11 ते 13 वयोगटात 48.5 कीलो वजनगटात सेमी कॉन्टॅक्ट मध्ये प्रणिता इंगोले हिला प्रथम फेरी मधून खेळायला खेळाडू नसल्यामुळे दुसऱ्या फेरीत टाकण्यात आले. दुसऱ्या फेरीमध्ये प्रणिता इंगोले हिच्यावर बिहारच्या पल्लवी हिने मात केली.  प्रणिता इंगोले हिने कास्य पदकाची कमाई केली.

14 ते 18  वयोगटात  39 कीलो वजनगटात फुल्ल कॉन्टॅक्ट मध्ये ऐश्वर्या गोरड हिने प्रथम फेरीमध्ये दिल्लीच्या तमन्ना हिच्यावर मात केली. तर दुसऱ्या फेरीत महाराष्ट्रच्या साक्षीने ऐश्वर्या गोरडवर मात केली. या पराभवामुळे ऐश्वर्या गोरड हिने रौप्य पदक पटकावले. 46 किलो वजनगटात फुल्ल कॉन्टॅक्ट मध्ये प्रतीक्षा मरसाळेवर द्वितीय फेरीत ओडीसाच्या जाशमीनने मात केली. त्यामुळे मरसाळेला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले.

योद्धा मार्शल आर्टसचे संस्थापक,प्रशिक्षक रामप्रसाद सोनुने यांच्या मार्गदर्शनात विद्यार्थिनींनी 1 सुवर्ण 2 रौप्य तर 1 कांस्य पदकाची कमाई केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)