योजनेच्या उद्दीष्टामध्ये वाढ करण्याची मागणी

पुणे, दि. 3 – वैयक्तीक लाभाच्या योजने (डीबीटी) अंतर्गत पशुसंवर्धन विभागाकडून देण्यात येणाऱ्या योजनांचा लाभ घेण्यासाठी जिल्ह्यातून मोठ्या संख्येने लाभार्थ्यांचे अर्ज आले आहेत. त्यामध्ये प्रत्येक तालुक्‍यांना उद्दिष्ट देण्यात आले आहे. परंतु, प्राप्त अर्जांच्या तुलनेत हे उद्दीष्ट खूपच कमी असून, त्यामध्ये वाढ करण्याची मागणी जिल्हा परिषद सदस्य अभिजीत तांबिले यांनी केली आहे. त्याबाबतचे निवेदन जिल्हा परिषद अध्यक्ष विश्‍वासराव देवकाते आणि मुख्य कार्यकारी अधिकारी सूरज मांढरे यांना दिले आहे.

डीबीचा लाभ घेण्यासाठी जिल्ह्यातील लाभार्थ्यांना अर्ज करण्यासाठी 2 ऑगस्ट ही अंतीम मुदत दिली होती. त्यानुसार यंदा पशुसंवर्धन विभागाकडून मिल्किंग मशीन, तलंग वाटप आणि मैत्रीण योजनेचा लाभ देण्यात येणार आहे. त्यासाठी प्रत्येक तालुक्‍याला उद्दीष्ट देण्यात आले असून, यावर्षी दिलेल्या उद्दीष्ट्यापेक्षा अर्जांची संख्या अधिक आहे. लाभ घेण्यासाठी लाभार्थ्यांना आवश्‍यक कागदपत्रे गोळा करताना दमछाक होते, तर पैसाही खर्च होतो. परंतु, अर्जाची संख्या लक्षात घेता लाभार्थ्यांना मिळणारा लाभ फारच कमी आहे. त्यामुळे त्यांना न्याय मिळत नाही. त्यामुळे लाभार्थ्यांना पाच शेळ्या देण्याऐवजी दोन शेळ्या दिल्या तर लाभार्थ्यांच्या संख्येत वाढ होईल. अशा प्रकारे प्रत्येक योजनेत बदल केला तर अनेकांना मदतीचा हात मिळेल आणि त्यांची आर्थिक सुधारणा होण्यास मदत होईल, असे तांबिले यांनी सांगितले.


-Ads-

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)