योग ही भारताने संपूर्ण जगाला दिलेली अमूल्य देणगी – राष्ट्रपती

मुंबई: योग ही भारताने संपूर्ण जगाला दिलेली अमूल्य देणगी असून योगामुळे मनुष्य, समाज, देश आणि विश्व जोडण्याचे काम होत असल्याचे गौरवोद्गार राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांनी काढले.योग प्रशिक्षण संस्थेचा शताब्दी महोत्सव वांद्रे कुर्ला संकुलातील एमएमआरडीए मैदानावर आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रपती राम नाथ कोविंद उपस्थित होते. त्यावेळी राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांनी येणाऱ्या काळातही या संस्थेने मानवी जीवनाच्या विकासात योगदान देण्यासाठी महत्त्वपूर्ण योगदान द्यावे, अशी भावना व्यक्त केली.

राष्ट्रपती म्हणाले, मुंबई देशाची आर्थिक, सांस्कृतिक राजधानी आहे. आज येथे मनुष्य जीवनाच्या संबंधित सर्व कला, संस्कृती, विज्ञान,अध्यात्म आदींच्या अभ्यासासोबत योग विद्येचा अभ्यासदेखील प्रामुख्याने होतो. योग विद्येच्या प्रचार आणि प्रसारासाठी अनेक महान व्यक्तींनी आपले मोलाचे योगदान दिले आहे. आज या संस्थेला 100 वर्ष पूर्ण झाली असली तरी येणाऱ्या काळात या संस्थेला समाजाच्या संतुलित विकासासाठी, आरोग्यासाठी योगदान द्यायचे आहे. मला आनंद वाटतो की ट्रक चालकांसाठी ट्रक आसन निर्माण केले. योग हे शरीर मन आणि आत्मा यांना जोडण्याचे काम करत असून आज योग हा आंतरराष्ट्रीय पातळीवरही स्वीकारला गेला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

दादाभाई नौरोजी यांचे योगा इन्स्टिट्यूटच्या निर्माणासाठी महत्त्वपूर्ण योगदान

राष्ट्रपती राम नाथ कोविंद म्हणाले, आधुनिक भारतात लोकतंत्र चिरायु होण्यासाठी अनेक महापुरुषांनी काम केले आहे. त्यापैकी एक नाव म्हणजे दादाभाई नौरोजी. हे वर्ष त्यांचे जन्मशताब्दी वर्ष असून त्यांचे अनेक क्षेत्रात मोलाचे सहकार्य लाभले आहे. तसेच योगा इन्स्टिट्यूटच्या निर्माणासाठी दादाभाई नौरोजी यांचे प्रमुख योगदान लाभले आहे. यामुळे या त्यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त आणि त्यांच्या स्मरणार्थ आपण या कार्यक्रमाच्या निमित्ताने त्यांना श्रद्धापूर्वक श्रद्धांजली वाहतो.

योग सर्व वयोगटांसाठी उपयुक्त

योगा इन्स्टिट्यूटने 1934 मध्ये एक पुस्तक प्रकाशित केले होते ज्यामध्ये सामान्य घरगुती जीवन जगणाऱ्या लोकांसाठी योग विद्या अधिक सुलभ करून देण्यात आली होती, यामध्ये महिलांसाठी उपयुक्त आसनांचा समावेश होता अशा प्रकारे सूज्ञ युवक, बालक, वयस्कर नागरिकांसाठी हे पुस्तक उपयुक्त होते. योग अभ्यास प्रत्येकाच्या उत्तम स्वास्थ्यासाठी लाभदायक आहे. 2015 पासून आपण दरवर्षी 21 जून हा आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून साजरा करत असल्याचे राष्ट्रपती राम नाथ कोविंद आपल्या भाषणात म्हणाले.

योगविद्या मानवतेची साधनाच

राष्ट्रपती यावेळी म्हणाले, योगविद्या म्हणजे मानवतेची साधना आहे या विद्येमध्ये सर्व देशांना आपल्यासोबत जोडण्याचे सामर्थ्य आहे. योगविद्येच्या विकासासाठी भारत सरकार कटिबद्ध असून या विद्येला फक्त भारतासाठी सीमित न ठेवता भारताबाहेर नेऊन ठेवले आहे आणि व्यापक रूप दिले आहे. यावर्षी योग साधनेत केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल अनेक युवक आणि युवतींना पद्मश्री हा मानाचा पुरस्कार बहाल करण्यात आला आहे.

योगविद्या ही जीवन जगण्याची कला

योगविद्या कोणत्याही संप्रदाय, जाती धर्माची नाही तर योग विद्या ही जीवन जगण्याची कला आहे.  योगविद्या आत्मसात असल्याने आपण आपले मन, शरीर आणि पूर्ण व्यक्तिमत्व विकसित करू शकतो. देशातील नवीन पिढीला योगविद्येचे ज्ञान मिळावे म्हणून अनेक राज्यात योगविद्येचे धडे शालेय आणि महाविद्यालयीन अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यात आले आहेत. आजची आपली जीवनशैली पाहता आपण सर्वांनी योगविद्येचा फायदा घेतला पाहिजे, असेही राष्ट्रपती आपल्या भाषणात म्हणाले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)