योग विद्या धामतर्फे योग जिज्ञासा कार्यक्रमाचे आयोजन

योगशास्त्रा विषयीच्या सर्व प्रश्‍नांची उत्तरे शोधणारा कार्यक्रम

नगर – योग विद्या धाम अहमदनगरतर्फे योग विद्या धामचे संस्थापक व योग विद्या गुरुकुल, तळवाडे, नाशिकचे कुलगुरु डॉ. विश्‍वासराव मंडलिक यांच्या योग जिज्ञासा या योगशास्त्राबाबत सर्वसामान्य नागरीकांच्या मनात असलेल्या विविध शंकावर आधारित कार्यक्रमाचे आयोजन करण्याचे निर्धारित केले आहे.

-Ads-

महर्षि पतंजलींनी योग शास्त्राची सूत्रबध्द रचना केली, योगशास्त्र आज अखिल मानवजातीचे आधारस्तंभ बनले आहे. योग विद्या धाम व अनेक संस्था या शास्त्राचे ज्ञान जनमानसात पोहोचविण्यासाठी अखंड प्रयत्नशील आहेत. मात्र अद्यापही या शास्त्रा विषयीची गुढता अनेकांच्या मनात आहेच. निरोगी व तितक्‍याच व्याधीग्रस्तांमध्ये आपल्या या निरोगीपण व व्याधिग्रस्तता या दोन्ही अवस्थांबाबत प्रचंड उत्सुकता असते. ही उत्सुकता विविध प्रश्‍नांना जन्म देते. योग जिज्ञासा हा या प्रश्‍नांची शास्त्राधाराद्वारे उकल करणारा अशा स्वरुपाचा एकमेव कार्यक्रम आहे.
50 वर्षापुर्वी नासिकच्या तपोभूमीत योग विद्या धामची स्थापना गुरुजींनी केली. गेल्या 50 वर्षात भारतीय योग शास्त्राचा प्रचार-प्रसार गुरुजींनी जगभरात केला. या कालावधीत असंख्य व्यक्तींशी त्यांचा संपर्क आला, जागतीक पातळीवरील मानवी जीवनशैलीतील बदल त्यांचा मानवी जीवनावरील परीणामांचा सखोल अभ्यास गुरुजींनी केला . योगासने, प्राणायाम व ध्यानच्या आधारे यावर उपाय शोधले. योग जिज्ञासा हा कार्यक्रम याच दीर्घ अभ्यासाचा परीपाक आहे.

नागरीकांच्या मनातील शंकांच्या समुळ उच्चाटनासाठी व सर्वार्थांने योग जनमानसात रुजवण्यासाठी या कार्यक्रम नगरला व्हावा ही कल्पना योग विद्या धामच्या साधकांच्या मनात दीर्घकाळ होती. या कार्यक्रमाच्या निमित्ताने ही इच्छा लवकरच साकारणार आहे. योग शास्त्राच्या अभ्यासकांसह सामान्यातील सामान्य नागरीकाला योग साध्या सोप्या ओघवत्या भाषेत समजवणार्या या कार्यक्रमाचा लाभ या निमित्ताने नगरकरांना होणार आहे, त्याचा प्रत्येकाने लाभ घ्यावा असे आवाहन योग विद्या धामतर्फे शाम शर्मा यांनी केले आहे.

या महत्वाकांक्षी प्रकल्पाच्या आयोजनासाठी दत्तात्रेय दिकोंडा, उपाध्यक्ष, नेत्रतज्ज्ञ सुंदर गोरे, कार्याध्यक्ष कृष्णराव बागडे, मनिषा लगड, सचिव संदिप मुळे, सुषमा भागवत, कोषाध्यक्ष माणिक अडाणे, निधी संकलन प्रमुख दिलीप देशपांडे सुभाष पांढरे यांच्या मार्गदर्शनाखाली वर्ग संचालक प्रमोद डोळसे, सुरेश पाटील, राजन कुमार, हेमंत आयचिते, अनिरुध्द भागवत, पुरुषोत्तम उपाध्ये, किशोर फिरोदिया, किरण रनमाळे आदी पदाधिकारी, योग शिक्षक, साधक हिरीरीने प्रयत्न करीत आहेत. अधिक माहितीसाठी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात येत आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
3 :thumbsup: Thumbs up
3 :heart: Love
3 :joy: Joy
3 :heart_eyes: Awesome
3 :blush: Great
3 :cry: Sad
3 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)