योग्य मोबदला द्या, नाही तर इच्छामरण द्या; 91 शेतकऱ्यांची राज्यपालांकडे मागणी

मुंबई -महाराष्ट्राच्या बुलढाणा जिल्ह्यातील 91 शेतकऱ्यांनी राज्यपालांकडे इच्छामृत्यूची परवानगी मागितली आहे. उपविभागीय अधिकाऱ्याच्या माध्यमातून राज्यपाल आणि राष्ट्रपतींकडे इच्छामरणाची मागणी सादर केली आहे. खामगाव तालुक्‍याच्या 11 गावातील या 91 शेतकऱ्यांनी आपली कैफियत मांडताना म्हटले आहे, की सरकारने आपल्या अधिग्रहित केलेल्या जमिनीचा अत्यंत तुटपुंजा मोबदला दिला आहे. योग्य मोबदला मिळावा म्हणून गेला महिनाभर उपोषण करूनही आपली कोणीही दाद घेत नाही.

त्यामुळे आपल्याला इच्छामरणाची परवानगी मिळावी. अलीकडेच सर्वोच्च न्यायालयाने इच्छामरणास अनुमती देण्याचा प्रस्ताव जाहीर केला आहे. त्याला धरून शेतकऱ्यांनी जमिनीचा योग्य मोबदला मिळणार नसेल राज्यपाल आणि राष्टृापतींकडे इच्छामरणाची परवानगी मागितली आहे. सध्या अमरावती ते नवापूर (गुजरात) राष्ट्रीय महामार्ग 6 चार पदरी करण्याचे काम चालू आहे. त्यासाठी अनेक शेतकऱ्यांची शेतीजमीन राज्य सरकारने अधिग्रहण केली आहे. मात्र त्यासाठी अत्यंत तुटपुंजा मोबदला दिल्याचा आणि कोणीही आपली दखल घेत नसल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे.
राज्याचे कृषी मंत्री पांडुरंत फुंडकर हे बुलढाण्याचे आहेत. खामगाव हे त्यांचे गाव आहे. त्यांचा मुलगा खामगवचा आमदार आहे. पण तरीही शेतकऱ्यांची बाजू समजून घेणारा कोणीही नाही. या अगतिकेपोटी या 91 शेतकऱ्यांनी राज्यपाल आणि राष्ट्रपतींकडे इच्छामरणाची अनुमती मागितली आहे.

संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकरी आज नाराज आहेत. कर्जमाफी आणि कृषी उत्पन्नाला योग्य भाव यासाठी आंदोलने चालू आहेत. काही दिवसांपूर्वी मागण्यांसाठी नाशिक ते मुंबई असा शेतकरी मोर्चा काढण्यात आला होता. आदिवासींनी समिनीच्या हक्कासाठी लढा उभारला आहे’दिल्लीत अण्णा हजारे अनेक मागण्यांसाठी उपोषणास बसले आहेत. अशा परिस्थितीत 91 शेतकऱ्यांची इच्छामृत्यूची मागणी सरकारला संकटात आणणारी ठरणार आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)