योगेश बोंबाळे ठरला सुवर्णयुग केसरीचा मानकरी

निमगाव केतकी येथिल गणेश यात्रेसाठी हजारोंची उपस्थिती

रेडा- येथील सुवर्णयुग ट्रस्ट आणि अष्टविनायक ग्रुपने आयोजित केलेल्या गणेश यात्रेतील कुस्ती आखाड्यात भारत केसरी योगेश बोंबाळे सुवर्णयुग केसरीचा मानकरी ठरला. त्याने त्रिमूर्ती केसरी राजेंद्र राजमानेवर गुणावर मात केली. कळस येथील नेचर डिलाईट डेअरीने ही एक लाख रुपये इनामाची कुस्ती पुरस्कृत केली होती.
आखाड्यात तीनशेहुन अधिक कुस्त्या रंगतदार झाल्या. बुधवारी चिंचेच्या आखाड्यात बोंबाळे विरुद्ध राजमाने ही प्रथम क्रमांकाची कुस्ती नेचर डिलाइट डेअरीचे अध्यक्ष अर्जुन देसाई, संचालक केशव हेगडे, कांतीलाल जामदार यांच्या हस्ते लावण्यात आली. दादा मुलाणीने सुरेश ठाकूरला आस्मान दाखविले. महारुद्र काळेल ऑल इंडिया चॅम्पियन सागर मारकड, संतोष हेगडे, अभिजित शेंडे, यश शेंडे, ओम करे, सनी हेगडे यांनी चमकदार विजय मिळविले.
या आखाड्यात आमदार दत्तात्रय भरणे, जिल्हा परिषदेचे बांधकाम व आरोग्य सभापती प्रवीण माने, महाराष्ट्र केसरी अप्पा कदम, पुणे विचारपीठाचे अध्यक्ष रवींद्र माळवदकर, कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष डॉ. कृष्णाजी यादव, भाई कात्रे, उद्योजक वसंत मोहोळकर, सागर भोसले, जय फडतरे, माजी सभापती अंकुश जाधव, प्रसिद्ध मल्ल अण्णा शिंदे, रतन हेगडे, अरुण भागवत, तात्यासाहेब वडापुरे, सुरेश घाडगे, राजाराम शिंदे, नागकुमार भागवत यांच्या सर्व विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. मल्लसम्राट रावसाहेब मगर यांनी ट्रस्टचे अध्यक्ष मच्छिंद्र चांदणे, उपसभापती देवराज जाधव, ट्रस्टचे कार्याध्यक्ष दशरथ बनकर, उपाध्यक्ष सूर्यकांत महामुनी, खजिनदार भगवान घाडगे, सचिव किशोर पवार, विश्वस्त बापू घाडगे, भारत मोरे यांचा फेटा बांधून सत्कार करण्यात आला. आखाड्यात यशस्वीपणे पार पाडण्यासाठी अष्टविनायक ग्रुपचे सचिन चांदणे, नंदकुमार चकोर, वैभव मोरे ,अस्लम मुलाणी , सचिन बनकर, अजित भोंग , संतोष भोंग ,दत्ता चांदणे, चेतन घाडगे ,विजय पवार यांच्यासह सहकार्यांनी विशेष परिश्रम घेतले. ज्येष्ठ निवेदक शंकर पुजारी ,बारामतीचे प्रशांत भागवत ,प्रवीण ठवरे, सुभाष दिवसे व संतोष गदादे यांनी कुस्ती निवेदन केले. सकाळी गणेशयाग बारा वाजता महामंगल आरती त्यानंतर हजारो भाविकांना महाप्रसादाची सोय करण्यात आली होती. रात्री तुझ्यात जीव रंगला त्या कार्यक्रमाने तीन दिवस सुरू असलेल्या यात्रेची सांगता झाली.

  • कुस्ती क्षेत्रातील एनएसआय कोच मारुती मारकड यांना आखाड्यात जीवनगौरव पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. मानपत्र, स्मृतीचिन्ह आणि पंचवीस हजार रोख रक्कम असे पुरस्काराचे स्वरूप होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)