योगी सरकार साध्वी प्राची यांच्यावरील खटला मागे घेणार

लखनऊ : उत्तर प्रदेशमधील योगी सरकारने साध्वी प्राची आणि भाजपाच्या दोन नेत्यांवरील प्रक्षोभक  भाषण केल्याप्रकरणी दाखल असलेले खटले मागे घेण्याची तयारी सुरु केली आहे. उत्तर प्रदेशातील जातीय हिंसाचारप्रकरणी खुनाच्या १३ प्रकरणांसह तब्बल १३१ खटले मागे घेण्याची प्रक्रिया योगी सरकारने सुरु केली आहे.

मुझफ्फरनगरमध्ये दंगलीपूर्वी आयोजित करण्यात आलेल्या महापंचायतीत साध्वी प्राची, भाजपाचे खासदार कुँवर भारतेंद्र सिंह आणि संजीव बालयन तसेच आमदार उमेश मलिक, संगीत सोम आणि सुरेश राणा यांनी द्वेष पसरवणारी भाषणे केली होती. बालयन हे २०१७ पर्यंत केंद्रात तर राणा हे उत्तर प्रदेशमध्ये मंत्री होते. कावल गावात शाहनवाझ याच्या हत्येनंतर सचिन आणि गौरव यांची बेदम मारहाणीत हत्या झाली होती. त्या मुद्द्यावरुन ही महापंचायत आयोजित करण्यात आली होती. या तीन हत्यानंतर ७ सप्टेंबर २०१७ रोजी जिल्ह्यात हिंसाचाराचा उद्रेक झाला होता. या प्रकरणी संबंधितांविरोधात गुन्हा दाखल झाला होता.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)