योगी सरकार धर्म पाहून खटले मागे घेत आहे – कॉंग्रेस

कॉंग्रेसचा आरोप
नवी दिल्ली – मुज्जफरनगर येथील दंगलीच्या प्रकरणातील खटले आरोपींचे धर्म पाहून मागे घेतले जात आहेत व त्यात धर्माच्या आधारे पक्षपात केला जात आहे, असा आरोप कॉंग्रेस पक्षाने केला आहे. पक्षाचे प्रवक्‍ते रणदीप सुर्जेवाला यांनी हा आरोप करताना म्हटले आहे की “फोडा आणि झोडा’ या ब्रिटिश राजनीतीप्रमाणे भाजपचा कारभार सुरू आहे. तुम्ही कोणत्या धर्माचे आहात हे पाहून एखाद्यावरील खटले मागे घेतले जाऊ शकतात काय, असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.

ते म्हणाले की, मुज्जफरनगर दंगल प्रकरणात एकूण 503 खटले दाखल झाले असून त्यातील 179 खटले मागे घेण्याची विनंती भाजपच्या नेत्यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना 5 फेब्रुवारी 2018 रोजी केली आहे. दंगलीच्या प्रकरणातील सर्वच प्रकरणांचा सत्य तपासून फेरविचार करण्याचा निर्णय योगी सरकारने जाहीर केला होता. मग 503 पैकी केवळ 179 खटलेच का मागे घेतले जाणार आहेत असा सवाल त्यांनी केला.

भाजप नेते किंवा त्यांच्याशी संबिंधत लोकांचेच खटले मागे घेतले जात आहेत, असेही त्यांचे म्हणणे आहे. सुप्रीम कोर्टाने हे खटले फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्याचा निर्णय दिला तर आपल्याच पक्षाचे आमदार, खासदार अडचणीत येतील अशी त्यांना भीती वाटते आहे काय, असा सवालही त्यांनी योगींना केला, मुज्जफरनगर परिसरात सप्टेंबर 2013 रोजी झालेल्या दंगलीत 62 जण मरण पावले आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)