योगी सरकारवर प्रह्लाद मोदींचे भ्रष्टाचाराचे आरोप 

वाराणसी (उत्तर प्रदेश): पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे बंधू प्रह्लाद मोदी यांनी योगी सरकारवर भ्रष्टाचाराचे आरोप करून खळबळ उडवून दिली आहे. राष्ट्रीय अन्न सुरक्षा अंतर्गत घरपोच वितरण (डोअर स्टेप डिलीव्हरी) योजनेत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करून या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची मागणी प्रह्लाद मोदी यांनी केली आहे. प्रह्लाद मोदी हे एआयएफपीएसडीएफ (ऑल इंडिया फेयर प्राईस शॉप डीलर फेडरेशन)चे अध्यक्ष आहेत.

राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम 2013 नुसार कोटेदारांना प्रत्येक घरपोच वितरणासाठी 17 रुपये देयकाची तरतूद आहे. मात्र त्यांना ते दिले जात नाही, याबाबत कोणी अधिकारी काही बोलण्यास तयार नाही आणि राज्य सरकारही मूग गिळून गप्प आहे. त्यामुळे या प्रकरणाची सीबीआय चौकशीची प्रह्लाद मोदी यांनी मागणी केली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

उत्तर प्रदेशमधील कोटेदारांच्या मागणीवरूनचा आपण हा मुद्दा उचलून धरत असल्याचे प्रह्लाद मोदी यांनी म्हटले आहे. मात्र राफेल प्रकरणी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे बाजू उचलून धरली आहे. आपला भाऊ प्रामाणिक आहे. तो भ्रष्टाचार करणार नाही, असे स्पष्टीकरण त्यांनी दिले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)