योगी खडेश्‍वरी महाराजांचे उत्तराधिकारी योगी किशननाथजी महाराज

मंचर- अवसरी फाटा (ता. आंबेगाव) येथील गोरक्षनाथ टेकडीवरील योगी रविनाथजी ऊर्फ खडेश्‍वरी महाराज यांच्या निधनानंतर त्यांचे उत्तराधिकारी म्हणून योगी किशननाथजी महाराज यांची नियुक्ती करण्यात आली आहे. योगी किशननाथजी महाराज यांना चादर चढवून नाथसंप्रदायाच्या परंपरेनुसार मान देण्यात आला.
योगी रविनाथजी ऊर्फ खडेश्‍वरी महाराजांच्या निधनामुळे गोरक्षनाथ टेकडीवर झालेल्या उत्तराधिकारी नियुक्ती कार्यक्रमप्रसंगी अखिल भारत वर्षीय 12 पंथ नाथपंथीयांचे राष्ट्रीय उपाध्यक्ष पीर महंत बालकनाथ योगी, हरियाणा येथील पीर राजनाथजी,12 के महंत योगी कृष्णनाथजी, 18 के योगी सेवानाथजी, महंत योगी सूरजनाथजी, पीर गणेशनाथजी, महंत शंकरनाथजी,पीर पारसनाथजी, महंत तेजनाथजी, पीर शामनाथजी, पीर नारायणनाथजी, पीर अजेय नाथजी, गोविद खिलारी, गोरक्षनाथ सेवा मंडळाचे संचालक जयराम मोटवाणी, किशोर अडवाणी, सचिव सुरेश भोर, मिलिंद खुडे, ज्येष्ठ पत्रकार डी. के.वळसे पाटील, दत्ता थोरात, हभप पांडुरंग महाराज येवले, निळकंठ खुडे यांसह नाथपंथीय समाजबांधव तसेच तांबडेमळा,शेवाळवाडी, अवसरी खुर्द, मंचर येथील ग्रामस्थ, गोरक्षनाथ सेवा मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी गुजरात, कर्नाटक, हरियाणा, दिल्ली, राजस्थानसह महाराष्ट्रातून भाविक भक्त आले होते.योगी किशननाथजी महाराज यांची येथील गादीवर नियुक्ती झाल्यानंतर ते म्हणाले की, स्वर्गीय योगी रविनाथजी ऊर्फ खडेश्‍वरी महाराज यांनी दिलेल्या विचारांची जपणूक केली जाईल, तसेच गोरक्षनाथ टेकडीचे पावित्र्य राखले जाईल.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)