योगी आदित्यनाथ यांनी विधानसभेत मांडले उप्रकोका बिल

लखनौ (उत्तर प्रदेश) – महाराष्ट्रातील मकोका ( महाराष्ट्र कंट्रोल ऑफ ऑर्गनाईझ्ड क्राईम ऍक्‍ट – महाराष्ट्र संघटित अपराध नियंत्रण अधिनियम ) च्या धर्तीवरील उप्रकोका (उत्तर प्रदेश कंट्रोल ऑफ ऑर्गनाईझ्ड क्राईम ऍक्‍ट) बिल उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी विधानसभेत मांडले.

आज हे बिल विधानसभेत दुसऱ्यांदा मांडण्यात आले. 21 डिसेंबर रोजी हे बिल विधानसभेत मंजूर करंण्यात आले होते. नंतर ते विधान परिषदेत मांडण्यात आले होते. मात्र विरोधी पक्षांच्या विरोधामुळे ते नंतर प्रवर समितीकडे पाठवण्यात आले होते. 13 मार्च रोजी विधान परिषदेत हे बिल विरोधी पक्षांच्या एकीमुळे मंजूर होऊ शकले नव्हते. प्रक्रियेनुसार हे बिल आता नव्याने विधानसभेत मांडण्यात आले आहे.

आपल्या राजकीय विरोधकांना नमवण्यासाठी सरकार या बिलाचा वापर करील असे विरोधी पक्षांचे म्हणणे आहे. राज्यात होणाऱ्या गुन्ह्यांवर नियंत्रण आणण्यासाठी सरकारला हे बिल मंजूर करून घ्यायचे आहे. उप्रकोकाखाली अटक करण्यात आलेल्या व्यक्तीला 6 महिन्यांपर्यंत जामीन मिळू शकणार नाही. आणि या खाली किमान 5 वर्षे तुरुंगवासाची तरतूद ठेवण्यात आलेली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)