योगी आदित्यनाथ यांना मुख्यमंत्रीपदावरून हटावा! भाजपच्या ज्येष्ठ नेत्याची मागणी

नवी दिल्ली: भाजपच्या आणखी एका नेत्याने मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे. भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते संघप्रिय गौतम यांनी मोदी-शहा जोडगोळीच्या कामकाज पद्धतीवर स्पष्ट नाराजी व्यक्त केले.

योगी आदित्यनाथ यांना उत्तरप्रदेशच्या मुख्यमंत्रीपदावरून हटवून त्यांना धार्मिक कार्यासाठी पाठवून द्यावे आणि राजनाथसिंग यांची तेथे नेमणूक करावी असे त्यांनी म्हटले आहे. या आधी विदर्भातील भाजपचे एक नेते किशोर तिवारी यांनीही सरसंघचालकांना पत्र पाठवून भाजपचे नेतृत्व मोदींऐवजी नितीन गडकरी यांच्याकडे देण्याची मागणी केली होती.

मोदींचा प्रभाव कमी झाला असून त्यांच्या नावावर आता भाजपला निवडणूक जिंकता येणार नाहीं. ही बाब पक्षाच्या कार्यकर्त्यांनाहीं मान्य आहे. पण उघडपणे बोलण्याचे धाडस कोणीही दाखवत नाही. आज मोदींच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवल्यास काही मोजकी राज्ये वगळता सर्व राज्यांमध्ये भाजपचा पराभव होईल इतकी आज खराब स्थिती आहे असे त्यांनी म्हटले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)