योगी आदित्यनाथ उभारणार १५१ मीटर उंच श्रीरामांची मूर्ती 

लखनऊ – जगातील सर्वात उंच १८२ मीटर उंच सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याचे अनावरण काहीच दिवसांपूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते झाले. याच धर्तीवर आता उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ लवकरच १५१ मीटर उंच भगवान श्रीरामांचा ब्रॉन्झचा पुतळा उभारणार आहेत. राजाच्या स्वरूपात धनुर्धारी असे श्रीराम यांच्या पुतळ्याचे स्वरूप असणार आहे.

सुत्रांनुसार, भगवान राम यांच्या पुतळ्याचे कामही मूर्तिकार राम सुतार यांना देण्यात येणार आहे. राम सुतार यांनी रामाच्या पुतळ्याची एक लहान प्रतिकृतीही योगी आदित्यनाथ यांना दाखवली असून ते त्यांना पसंत पडले असल्याचेही समजते आहे. अयोध्येतील शरयू नदीच्या किनाऱ्यावर श्रीरामाचा भव्य पुतळा उभारला जाणार आहे. एक गॅलरी, म्युझिकल फाऊंटन, संग्रहालय हेदेखील या योजनेचा भाग असणार आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)