योगी आदित्यनाथ इतिहासात झिरो – ओवैसी 

नवी दिल्ली – तेलंगणा येथे होणाऱ्या आगामी विधानसभा निववडणुकांसाठीच्या शेवटच्या सत्रातील प्रचार सभांना सुरुवात झाली आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आपल्या पहिल्याच सभेमध्ये असदुद्दीन ओवैसी यांच्यावर घणाघात केला होता. ओवैसींनीही योगींवर पलटवार केला आहे. माझा जन्म भारतात झाला असल्याने शेवटच्या श्वासापर्यंत येथेच राहणार आहे. तसेच तुम्ही इतिहासात झिरो आहात, अशी टीका ओवैसींनी केली आहे.

योगी आदित्यनाथांनी ‘जर तेलंगणामध्ये भाजपाचे सरकार स्थापन झाले तर असदुद्दीन ओवेसी यांना निजामांप्रमाणे तेलंगणा मधून पळ काढावा लागेल’ असा सज्जड  इशारा दिला होता. यावर असदुद्दीन ओवैसी पलटवार करताना म्हंटले कि, तुम्हाला तारीखही माहित नाही. तुम्ही इतिहासात झिरो आहात. जर वाचता येत नसेल तर वाचकांना विचारा. इतिहास वाचला असता तर तुम्हांला माहिती असते कि, निजाम हैद्राबाद सोडून पळाले नव्हते. तर त्यांना राजप्रमुख बनविण्यात आले होते. भारत व चीनचे जेव्हा युद्ध झाले होते. त्यावेळी निजामांनी सोने देशाला दिले होते, असेही त्यांनी सांगितले.

ओवैसी पुढे म्हणाले, उत्तर प्रदेशमध्ये दरवर्षी १५० मुले इंसेफ्लाइटिसमुळे दगावतात. गोरखपूर रुग्णालायतील मुलांना ऑक्सिजन मिळत नाही आणि त्यांना ती चिंता नसून येथे येऊन नफरतची भिंत उभी करत आहेत, अशा शब्दात योगी आदित्यनाथांना त्यांनी सुनावले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)