योगा शिकवण्यासाठी रामदेव बाबांना पाकिस्तानकडून निमंत्रण

अहमदाबाद – जगभरात 21 जून आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून साजरा करण्यात येतो. त्यानिमित्ताने भारतात जागोजागी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. या दिनानिमित्य गुजरातमधील अहमदाबादमध्ये योगगुरु रामदेव बाबा यांनी सुद्धा 4 दिवसांच्या योग शिबिराला सुरूवात केली आहे. या शिबिरात बोलताना योगा शिकवण्यासाठी पाकिस्तानकडून निमंत्रण आल्याचे रामदेव बाबा म्हणाले.

पाकिस्तानमधला प्रत्येक व्यक्ती हा दहशतवादी नाही. योगा शिकवण्याची गरज शेजारील देशांनाही आहे. मात्र, पाकिस्तानातल्या राजकीय अस्थिरतेची मला चिंता वाटत असल्याचे ते म्हणाले. तरी सुद्धा आपण पाकिस्तानात जाणार असेही त्यांनी स्पष्ट केले.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)