योगा दिवसाचा संदेश ग्लोबल रेकॉर्डसमध्ये नोंद

नागठाणे ः प्रजापिता ब्रह्माकुमारी विश्वविद्यालयाच्या पदाधिकार्‍यांना प्रमाणपत्र देताना सिक्कीमचे राज्यपाल श्रीनिवास पाटील.

नागठाणे, दि. 26 (प्रतिनिधी) – 20 फुट उंच व 85 फुट रूंद असलेल्या जगात सर्वात मोठे वर्तमानपत्र बनवून प्रजापिता ब्रह्माकुमारी विश्वविद्यालयाद्वारे सातारा येथे “आंतरराष्ट्रिय योग दिवस’ साजरा केला गेला. याची नोंद “ग्लोबल रेकॉर्डस’मध्ये झाल्याचे प्रमाणपत्र सिक्कीमचे राज्यपाल श्रीनिवास पाटील यांच्या हस्ते डॉ. ब्रह्मकुमार दीपक हरके, ब्रह्मकुमारी सुवर्णा, ब्रह्मकुमारी अंकिता यांना देण्यात आला.
आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त 21 जून रोजी प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाच्या नागठाणे (ता. सातारा) सेवा केंद्रातर्फे 20 फुट उंच व 85 फुट रूंद आकाराच्या जगातील सर्वात जास्त लांबीचे वर्तमान पत्र बनविण्यात आले. सातारा येथील पोलीस परेड ग्राउंडवर जगातील सर्वात लांब वर्तमानपत्र लावण्यात आले. सातारा जिल्ह्याचे जिल्हा पोलीस अधिक्षक संदीप पाटील यांनी या विश्वविक्रमी वर्तमान पत्राचे उद्‌घाटन केले. यावेळी जिल्हा पोलीस उपअधीक्षक सौ. राजलक्ष्मी शिवणकर यांचेसह पोलीस कर्मचारी मोठ्या संखेने उपस्थित होते. या वर्तमान पत्रात राजयोगा विषयी माहिती आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी व प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाच्या मुख्य प्रशासकीय राजयोगिनी दादी जानकीजी यांचा आंतरराष्ट्रीय योगा दिनानिमित्त संदेश देण्यात आला आहे.

 

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)