योगा केल्याने अमित शहांचे 20 किलो वजन घटले – रामदेव बाबा

अहमदाबाद – जगभरात 21 जून आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून साजरा करण्यात येतो. त्यानिमित्ताने भारतात जागोजागी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. या दिनानिमित्य गुजरातमधील अहमदाबादमध्ये योगगुरु रामदेव बाबा यांनी सुद्धा चार दिवसांच्या योग शिबिराला सुरूवात केली आहे. या शिबिरात बोलताना रामदेव बाबा म्हणालेत, योग केल्याने वजन कमी होते. अमित शहा यांनी योगा करुन 20 किलो वजन कमी केले. यावेळी उदाहरण देताना त्यांनी भाजप अध्यक्ष अमित शहा यांचा उल्लेख केला.

जे लोक योगा हा खेळाचा प्रकार नसल्याचं मानतात, ते अज्ञानी आहेत. अशा लोकांच्या विचारांना सुद्धा कोणी मानू नये. योगाचा समावेश ऑलिम्पिक खेळांमध्ये करण्याचा प्रयत्न केला पाहिजे असेही ते म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)