योगामुळे निरोगी आयुष्य शक्‍य : धनंजय मलटणे

परखंदी हायस्कूलमध्ये विद्यार्थ्यांसाठी योग शिबिर

वाई – धकाधकीच्या जीवनात आरोग्याचा प्रश्‍न गंभीर झाला आहे. असून हवा, पाणी, अन्न दुषीत झाले आहे. त्यामुळे लहान मुलांपासून मोठया व्यक्तींना गंभीर आजार होताना दिसत आहे.आपल्या जीवनात जसे मुलभुत गरजांना महत्व तसेच निरोगी आरोग्यालाही अनन्यसाधारण महत्व आहे असे उद्‌गार माजी नगरसेवक व पंतजलि योग समितीचे योगशिक्षक धनंजय मलटणे यांनी परखंदी हायस्कूल व प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांसाठी आयोजित तीन दिवशीय योग शिबिरात मार्गदर्शन करताना काढले. यावेळी योगशिक्षक रामदास राऊत, डॉ. सुनिल देशपांडे, पी. एस. भिलारे, सुभाष यादव, मुख्याध्यापक प्रसाद यादव, भगवान पेटकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

योगशिक्षक रामदास राऊत म्हणाले की, स्पर्धेच्या युगात विद्यार्थी आरोग्याकडे, आहाराकडे गांभीर्याने लक्ष देत नाहीत त्यामुळे आजारपणाला सामोरे जावे लागते. हे टाळण्यासाठी योगाला आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक बनवून नियमित योगा-प्राणायाम केल्यास निरोगी व सुखी जीवन जगू शकतो. कारण निरोगी आरोग्य ही यशस्वी करिअरची गुरूकिल्ली आहे. शिबिरात परखंदी हायस्कूल व जि. प. प्राथमिक शाळा परखंदीचे 160 विद्यार्थीनी व विदयार्थ्यांनी सहभाग घेतला.

यावेळी योग प्रशिक्षकांनी विदयार्थ्यांना योगा-प्राणायामचे प्रात्याक्षित करत तीन दिवस मार्गदर्शन केले. शिबिरास गोपाळराव महांगडे, विश्‍वास गायकवाड, धनाजी शिंदे, मोहनराव शिंदे,, राजकुमार शिंदे उपस्थित होते. शिबिर यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापक प्रसाद यादव, विजय भोईटे, शरद गायकवाड, पोपट जाधव, प्रतिभा भांडवलकर, उमेश शिंदे महेश महांगडे, रेखा गायकवाड शिक्षक, विद्यार्थी मोठया संख्येने होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)