योगराज ऍग्रो लिमिटेडकडून गुळ उत्पादन

भवानीनगर- शेतकरी सध्या आर्थिक अडचणीत असून उसाला म्हणावा तसा दर मिळत नसल्याने शेतकरी चिंतेत आहेत, याचाच विचार करून शेतकऱ्यांना वरदान ठरणारा योगराज ऍग्रो लिमिटेडच्यावतीने उसापासून गुळ, पावडर व खांडसरी निर्मितीचा कारखाना होत असून याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना न्याय देण्याचा प्रयत्न केला जाईल, असे योगराज ऍग्रोचे अध्यक्ष तानाजी थोरात यांनी सांगितले.
योगराज कारखान्याच्या कार्यालयाचा शुभारंभ व शेअर्स विक्री कार्यक्रम मानकरवाडी येथे झाला. कंपनीचे संस्थापक चेअरमन तानाजी थोरात यांनी सांगितले की, योगराज ऍग्रो लिमिटेड कंपनीकडून पुढील वर्षी कमीत कमी 70 हजार मेट्रिक टन ऊस गळपाचे उद्दिष्ठ ठेवले आहे. साधारण 17 ते 18 कोटी रूपये खर्च करून उभारण्यात येणाऱ्या कंपनीच्या शेअर्स विक्री शुभारंभामध्ये अनेक शेतकऱ्यांनी नाव नोंदणी केली असल्याचेही थोरात यांनी सांगितले.
भाजपा किसान मोर्चा महाराष्ट्र प्रदेशचे सरचिटणीस वासुदेव काळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमामध्ये इंदापुर बाजार समितीचे सभापती अप्पासाहेब जगदाळे, पुणे बाजार समितीचे माजी सभापती दिलीप खैरे, शिवसेनेचे नितीन कदम, इंदापूर पं.स.चे सभापती करणसिंह घोलप, छत्रपतीचे मा. उपाध्यक्ष बाळासाहेब पाटील, ऍड. प्रशांत रुपनवर, भाऊसाहेब सपकळ यांनी मनोगत व्यक्त केले.
या कार्यक्रमाला उत्तम फडतरे, विलास माने, रामचंद्र निंबाळकर, सचिन भाग्यवंत, गजानन वाकसे, भीमराव भोसले, बबन तावरे, ऍड. लक्ष्मण शिंगाडे, ऍड. हेमंत नरुटे, ऍड. सुनील पाटील, ऍड. संदीपन भोसले, ऍड. थोरात, माऊली चवरे , माऊली वाघमोडे, दयाराम सरक आदी मान्यवर उपस्थित होते. सूत्रसंचालन अनिल रुपनवरपरील व आभार धर्मेश थोरात यांनी मानले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)