योगाच्या माध्यमातून भारत-चीन सीमेवरील तणाव होणार कमी

नवी दिल्ली : डोकलाम वादानंतर भारत आणि चीनमधील तणाव कमी करण्यासाठी भारतीय सैन्याने नवा पुढाकार घेतला आहे. यंदा आंतरराष्ट्रीय योग दिनी चिनी सैन्य आणि भारतीय सुरक्षा दल एकत्रिपणे योग करू शकतात. लडाखच्या चुशलूमध्ये चिनी सैन्य आणि भारतीय सैन्यदलांदरम्यान झालेल्या बॉर्डर पर्सोनल मीटिंगमध्ये दोन्ही देशांच्या सैन्यांनी एकत्रित योगसरावाबद्दल चर्चा केली. परंतु अद्याप याबद्दल अंतिम निर्णय घेण्यात आलेला नाही.

दोन्ही देशांचे सैन्य लडाखमध्ये योगसराव करू शकतात. भारत आणि चीनमधील संबंध सुरळीत करण्यास योगसराव सहाय्यभूत ठरू शकतो. पंतप्रधान नरेंद मोदींच्या चीन दौऱयाच्या अगोदर दोन्ही देशांचे संबंध सुधारावेत यासाठी प्रयत्न होत आहे. मागील काही दिवसांमध्ये चिनी सैनिक भारतीय हद्दीत घुसखोरी करत असल्याने सीमेवरील तणाव वाढतोय. अशा स्थितीत योगद्वारे दोन्ही देशांच्या सैनिकांमधील तणाव कमी करण्यास मदत होऊ शकते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)