‘ये रिश्‍ते है प्यार के’मध्ये कुणाल कुहूला पळवून नेतो

“ये रिश्‍ते है प्यार के’ ही सिरीयल “ये रिश्‍ता क्‍या कहलाता है’ नावाच्या सिरीयलशी बरीच मिळतीजुळती आहे. या सिरीयलमध्ये सध्या बरीच घडामोड होते आहे. कुणाल आणि कुहू एकमेकांच्या प्रेमात पडले आहेत. याच वेळी अबीर अणि मिश्‍ती हेदेखील एकमेकांकडे आकर्षित व्हायला लागले आहेत. अबीरला एका अपघाताच्यावेळी मिश्‍ती वाचवते. त्यामुळे अबीर आपल्या भावना मिश्‍तीपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो आहे. याचदरम्यान कुटुंबीयांकडून लग्नाला विरोध होण्याची शक्‍यता लक्षात घेऊन कुणाल कुहूला फूस लावून पळवून घेऊन जाण्याचा प्लॅन बनवतो. याचवेळी त्याला कुहूबाबतच्या खऱ्या प्रेमाचा साक्षात्कारही होतो.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)