येवली गावातून पायी पालखी पंढरपूरकडे रवाना

जोगवडी- विठ्ठल… विठ्ठल… विठ्ठल… अशा पांडुरंगाच्या आणि माउलींच्या गजरात मोठ्या उत्साहामध्ये भोर तालुक्‍यातील येवली आणि सांगवी या गावातील विठ्ठल भक्तांनी गुरुवारी (दि. 12) पायी वारीला प्रारंभ केला. पालखी सोहळ्यास मदत म्हणून जिल्हा परिषदेच्या माध्यमातून जि. प. सदस्य श्री विठ्ठल आवाळे यांच्या हस्ते औषधांच्या किटचे मोफत वाटप करण्यात आले. येवली, सांगवी पायी पालखीला पंढरपूरपर्यंत पोहचण्यासाठी 175 किलोमीटर अंतर कापावे लागत असून, आषाढी एकादशीच्या आधी एक दिवस हा सोहळा पंढरपूरला पोहोचणार आहे. बारा वर्षांपासून हा पालखीपूर्व सोहळा दरवर्षी पंढरपूरकडे रवाना होतो. या वर्षी पन्नास वारकरी सोहळ्यात सामील झाले आहेत. दररोज पंचवीस ते तीस किलोमीटर अंतर कापावे लागणार आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)