येवती यात्रेत पोलिसास मारहाण

उंडाळेतील एकावर गुन्हा

कराड – वाहतुकीचे नियमन करत असताना रस्त्याकडेला गाडी उभी करू नका, असे म्हटल्याच्या रागातून एकाने पोलिसास शिवीगाळ व मारहाण केली. याप्रकरणी संबंधितावर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. संग्राम जाधव (रा. उंडाळे, ता. कराड, मूळ रा. तारळे, ता. पाटण), असे संशयीताचे नाव आहे.

याबाबत कॉ. सचिन संजय वायदंडे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, दि. 24 रोजी रात्री कॉ. वायदंडे हे सहाय्यक पोलीस निरीक्षक चंद्रकांत माळी, आर. एस. पानवळ, डी. डी. कोळी, एस. व्ही खिलारे यांच्यासमवेत येवती (ता. कराड) येथील भैरवनाथ यात्रेच्या बंदोबस्तावर होते. यात्रेमुळे येवती-पाटीलवाडी मार्गावर वाहनांची गर्दी झाली होती. हवालदार सचिन वायदंडे हे तेथे वाहतुक नियमन करत होते. त्यावेळी दुचाकीवरून आलेले दोघे रस्त्यात गाडी थांबवून उभे राहिले.

हवालदार वायदंडे यांनी दुचाकीस्वारांना दुचाकी बाजुला घेण्यास सांगितले. मात्र, दुचाकीस्वाराने तू मला ओळखत नाही का? तुझ्यासारखे बरेच पोलीस मी कामाला लावले आहेत, असे म्हणत दमदाटी केली. दमदाटी सुरू असताना हवालदार वायदंडे यांनी मोबाईल काढला असता संशयितांनी त्यांना मारहाण केली. शर्टची बटणे तोडून शिवीगाळ केली आणि घटनास्थळावरून पसार झाला. बंदोबस्त संपल्यावर हवालदार वायदंडे यांनी तक्रार दाखल केली. वायदंडे यांच्या फिर्यादीवरून तालुका पोलीस ठाण्यात संशयीत संग्राम जाधव याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)