येळगावकरांच्या सांगाव्याला शिवेंद्रराजेंचे स्मितहास्याने उत्तर

सातारा, दि.23 (प्रतिनिधी)-

सातार्‍यात विविध विकास कामांच्या उद्घाटनासाठी मुख्यमंत्र्यासह अर्धा डझन मंत्री आले होते. या कार्यक्रमाला जिल्ह्यातील अनेक नेते झाडून हजर होते. मात्र या कार्यक्रमात मुख्यमंत्र्याची जेवढी झाली नाही तेवढी चर्चा छ. खा. उदयनराजे भोसले आणि छ.आ. शिवेंद्रराजे यांची होती. त्याचे कारण ही तसेच होते. छ.खा.उदयनराजे यांनी त्यांच्या भाषणात सातार्‍याचे आ.शिवेंद्रराजे यांचा वेळोवेळी नामोल्लेख केल्याने काही काळ उपस्थितांना लोकसभेची पेरणी सुरू असल्याचे लक्षात आले. त्यानंतर व्यासपीठावरील भाजपाचे नेते माजी आ. दिलीप येळगांवकर यांनी लगोलग शिवेंद्रराजेंच्या कानाला लागत मनोमिलन जाहीर झाले आहे, असा सांगावा धाडला.मात्र शिवेंद्रराजेंनी येळगावकरांच्या सांगाव्याला सध्या तरी फक्त स्मिहास्य करून ना ना केल्याचेच त्यांच्या देहबोलीवरून स्पष्ट झाले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

सातार्‍याच्या दोन्ही राजेंचे मनोमिलन हा मोठा चर्चेचा अन् कार्यकर्त्यांसाठी उत्सुकतेचा विषय आहे. दोन्ही राजेंच्यात मनोमिलन झाले तर आपले काय? या सवालाने डोके खाजवणार्‍या काही दुसर्‍या फळीतीळ कार्यकर्त्यांनाही सुरूची राड्यानंतर मनोमिलनाची आशा लागून राहीली आहे. पालीकेच्या सभेत मध्यतंरी एका नगरसेवकाने समस्त नेतेगणाला मनोमिलनाची साद घातली होती. मात्र सुरूची राडा आणि त्यानंतर भाजी मंडईतील अतिक्रमणावरून एकमेकांच्या समोर आलेले दोन्ही राजे, अन् उद्भवलेली परिस्थीती सातारकरांना ज्ञात आहे.

सध्या लोकसभेचे वारे वाहत असल्याने खा.छ.उदयनराजे भोसले यांनी सगळ्यांनाच आपलेसे करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. त्याचाच भाग म्हणून खासदारांनी सातार्‍यातील कालच्या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सभापती रामराजे,बंधु आ.शिंवेंद्रराजे यांच्या नावाचा उल्लेख आपल्या भाषणापुर्वी केला. त्यानंतर छ.शिवाजी संग्रायलयाच्या कामाला मुख्यमंत्र्याकडे निधी मागताना त्यांनी या कामात आ.शिवेंद्रराजे भोसले यांचेही योगदान असल्याचे सांगितले.

यावेळी उपस्थित मंडपात भाजपाची नाही तर दोन्ही राजेंच्या मनोलिनाची चर्चा सूरू झाली होती. मोठ्या राजेंनी धाकल्या राजेंचे कौतुक केल्यावर येळगावकरांनी लागलीच शिवेंद्रराजेंच्या कानाला लागत मनोलिन जाहीर झाले आहे, असे सांगितले. त्यावर शिवेंद्रराजेंनी मान हालवत प्रतिसाद दिला. दरम्यान शिवेंद्रराजेंच्या चेहर्‍यावरील भावमुद्रा मात्र त्यांनी येळगांवकरांच्या सांगाव्याला नकार दिल्याचे स्पष्ट करत होत्या.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)