येरवड्यात 14 मांजरी, सात कुत्र्यांवर विषप्रयोग

पुणे – येरवड्यामध्ये 14 मांजरे आणि 7 कुत्रे मृतावस्थेत सापडले आहेत. त्यांच्या शवविच्छेदनाच्या अहवालानुसार त्यांना विष देऊन मारण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. येथील प्राईडलनगर येथे मागील महिनाभरात ही घटना घडली आहे. यातील काही कुत्री व मांजरे ही पाळीव असल्याची माहिती समोर आली आहे.

येरवडा येथील प्राईडलनगरमध्ये बुधवारी सकाळी मॉर्निंग वॉकला काही नागरिक येथे आले होते. त्यावेळी त्यांना मांजर व कुत्री मृतावस्थेत आढळून आली. त्यांनी याची माहिती प्राणीमित्रांना दिली. त्यानंतर प्राणीमित्रांनीही येऊन त्याची पाहणी केली. त्यांनी सोसायटीच्या रहिवाशांकडे माहिती घेतली असता मागील महिनाभरात असे अनेक प्राणी मृतावस्थेत आढळून असल्याचे समजले. या प्रकारामुळे परिसरातील नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. या प्रकरणी सोसायटीतील नागरिकांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. यात कुत्र्यांच्या पिल्लांचाही समावेश आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)