येरवड्यात पार्किंगमधील गाड्या पेटविल्या

पुणे – घरासमोर पार्किंग करुन ठेवलेल्या दोन दुचाकी अज्ञात समाजकंटकांनी पेटवून दिल्या; यामध्ये दोन्ही दुचाकींचे अंदाजे साठ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. 12 जानेवारी रोजी रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास येरवडा येथील लक्ष्मीनगरमधील श्रीराम मित्र मंडळाच्या जवळ ही घटना घडली. येरवडा पोलिसांनी या समाजकंटकांच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून ते पसार झाले आहेत. सागर पाटील (वय 25, रा. येरवडा) यांनी यासंदर्भात येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार; सागर यांनी त्यांची पल्सर मोटारसायकल आणि त्यांच्या वडिलांची शाईन मोटारसायकल घराच्या समोर पार्किंग करुन ठेवली होती. अज्ञात समाजकंटकांनी या दोन्ही दुचाकी पेटवून दिल्या, सहाय्यक पोलीस निरीक्षक मारोडे अधिक तपास करत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)