येरवड्यात जीवघेणा हल्ला ; दोघांना पोलीस कोठडी

पुणे “तुम्हाला रागात बघायची सवय आहे, आमच्याशी नडता का, म्हणत जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणात येरवडा पोलिसांनी दोघांना अटक केली. याप्रकरणी दोघांना दि. 17 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे.
प्रफुल्ल ऊर्फ गुंड्या गणेश कसबे (वय 19, रा. लक्ष्मीनगर, येरवडा), नितीन शिवाजी कसबे (वय 22, रा. लक्ष्मीनगर, येरवडा), अशी पोलीस कोठडी झालेल्या दोघांची नावे आहेत. या प्रकरणात पोलिसांनी तीन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे. याबाबत मोसीन नजीर शेख (वय 19, रा. लक्ष्मीनगर, येरवडा) याने फिर्याद दिली आहे. ही घटना दि. 10 सप्टेंबर रोजी दुपारी येरवडा, सुभाषनगर येथील बुध्द विहारासमोर घडली. शेख हा मित्र आक्रम मुलाणी, आकील बागवान, शोएब सय्यद यांच्या बरोबर घरी जात होते. त्यावेळी प्रफुल्ल कसबे आणि त्याच्या इतर साथीदारांसह येवून शेख याला अडविले. तुम्हाला रागात बघायची सवय आहे, म्हणत पालघनने शेख याच्या डोक्‍यात वार करून त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. तसेच त्याच्या मित्रांना शिवीगाळ करून मारहाण केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणात पोलिसांनी दोघांना अटक करून न्यायालयात हजर केले. त्यावेळी गुन्ह्यातील हत्यार जप्त करण्यासाठी, आणखी कोणी साथीदार आहेत का?, याचा तपास करण्यासाठी दोघांना पोलीस कोठडी देण्याची मागणी सहायक सरकारी वकील हेमत मेंडकी यांनी केली. त्यानुसार न्यायालयाने दोघांना पोलीस कोठडी सुनावली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)