येरवडा जेल प्रशासनाच्या त्या अर्जावर गुरुवारी सुनावणी

माओवादी संघटनांशी संबंधित व्यक्तीला इतर कारागृहात हलविण्यासाठी करण्यात आला आहे अर्ज

पुणे – बंदी घातलेल्या सीपीआय या माओवादी संघटनेशी संबंध असल्याच्या आरोपावरून अटक करण्यात आलेल्या पाच संशयितांना दुसऱ्या कारागृहात हलविण्यात यावे, या मागणीसाठी येरवडा जेल प्रशासनाने केलेल्या अर्जावर गुरुवारी (6 सप्टेंबर) सुनावणी होणार आहे. सत्र न्यायाधीश के.डी.वडणे यांच्या न्यायालयात
सरकारी आणि बचाव पक्षाचा युक्तीवाद होणार आहे. बचाव पक्षातर्फे ऍड. रोहन नहार आणि ऍड. राहुल देशमुख काम पाहत आहेत.
भिमा-कोरेगाव दंगल आणि एल्गार परिषदेच्या अनुषंगाने माओवाद्यांशी संपर्क असल्याच्या आरोपावरून जून महिन्यात सुधीर ढवळे, सुरेंद्र गडलिंग, शोमा सेन, महेश राऊत, रोना विल्सन यांना अटक करण्यात आली आहे. पोलीस कोठडी संपल्यानंतर न्यायालयाने त्यांची रवानगी येरवडा कारागृहात केली आहे. मात्र, येरवडा येथील कारागृहात सध्या क्षमतेपेक्षा जास्त कैदी आहेत. माओवाद्यांची संपर्क असल्याच्या आरोप असलेल्यांना या ठिकाणी ठेवल्यास ते इतर कैद्यांना त्यांच्या संघटनेमध्ये सहभागी करून घेवू शकतात, त्यामुळे त्यांना कोल्हापूर, नाशिक किंवा औरंगाबाद येथील कारागृहात ठेवण्यात यावे, असा अर्ज येरवडा कारागृह प्रशासानाने 21 जुलै रोजी केला होता. जेलची क्षमता ही 2 हजार 449 कैदी ठेवण्याची आहे. असे असतानाही सध्या विविध गुन्ह्यांतील 5 हजार 500 पेक्षा अधिक कैदी याठिकाणी आहेत. त्यातून कारागृहात सुरक्षेचा प्रश्‍न निर्माण होवू शकतो, असे प्रशासनाने दिलेल्या अर्जात नमूद करण्यात आले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)