येरवडा कारागृहाच्या 150 मीटर परिसरात बांधकामांना बंदी

पुणे – येरवडा कारागृहाच्या सिमा भिंतीपासून 150 मीटरच्या परिसरातील बांधकामांना आता बंदी असणार आहे. शासनाने या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी कारागृह विभागाचे व संबंधित नियोजन प्राधिकरणाचे अधिकारी यांचा समावेश असलेली समिती स्थापन केली जाणार आहे.

महाराष्ट्र कारागृह (कारागृह इमारती व आरोग्य व्यवस्था) नियम 1964 यामध्ये शासनाने सुधारणा केली आहे. यापूर्वी या कलमाखाली कारागृहाच्या परिसरात बांधकाम करण्यास बंदी नव्हती.

राज्यातील कारागृहाच्या परिसरात वीस मीटरचा बफर क्षेत्राची निर्मिती करणे सोयीचे जावे, यासाठी राज्याच्या गृह विभागाकडून नव्याने या संदर्भातील आदेश लागू केले आहेत. या आदेशानुसार मुंबई कारागृहाच्या सीमा भिंतीपासून पाचशे मीटरच्या परीघ क्षेत्रात, इतर कोणत्याही मध्यवर्ती कारागृहाच्या 150 मीटरच्या परीघ क्षेत्रात, जिल्हा कारागृहाच्या शंभर मीटर, तर कोणत्याही उप-कारागृहाच्या पन्नास मीटर क्षेत्रात बांधकाम करण्यास बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे येरवडा कारागृहाच्या 150 मीटरच्या परीघ क्षेत्रात आता बांधकामांना बंदी आली आहे. जेणेकरून 20 मीटरच्या बफर क्षेत्राची निर्मिती सुलभ होईल आणि कारागृहाच्या संवेदनशील भागांतील थेट दृश्‍यमानतेमुळे किंवा अधिक जोखमीच्या कैद्यांची ये-जा असणाऱ्या भागांमध्ये कोणताही धोका निर्माण होणार नाही, असे गृह विभागाने या आदेशात नमूद केले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)