येरळवाडी धरणात तातडीने उरमोडीचे पाणी सोडा

वडूज – खटाव तालुक्‍यातील शेतकरी पाणीपट्टीचे पैसे भरण्यासाठी तयार असतील तर त्यांच्यासाठी येरळवाडी धरणात तातडीने उरमोडीचे पाणी द्यावे अशी सूचना जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल यांनी केली. यामुळे उरमोडीच्या पाण्यासाठी दि. 1 रोजी खटाव बंदची हाक देवून पुकारलेला बंद मागे घेण्यात आला.

जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या उरमोडी, वीज वितरण कंपनीचे अधिकारी व आंदोलनकर्त्यांच्या समन्वय बैठकीत त्या बोलत होत्या. यावेळी उपजिल्हाधिकारी संजय पाटील, माजी उपसभापती नाना पुजारी, संजय गांधी निराधार योजेनेचे अध्यक्ष विजय शिंदे, नगरसेवक शहाजी गोडसे, अंकुशराव दबडे, ज्ञानेश्‍वर इंगवले, धनाजी लवळे, लालासाहेब गोडसे, विजय बागल, दादा बुधे (मुकादम), मधुकर मोहिते यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी चर्चा करताना खटाव तालुक्‍यातील कार्यकर्त्यांनी माण तालुक्‍यात टंचाईमधून उरमोडीचे पाणी जात आहे. खटाव तालुक्‍यात पैसे भरूनसुध्दा वेळेत पाणी दिले जात नसल्याचा मुद्दा उपस्थित केला. त्यावेळी कार्यकारी अभियंता जाधव, उपअभियंता साळुंखे यांच्याकडून जिल्हाधिकाऱ्यांनी सविस्तर तांत्रिक माहिती जाणून घेतली. अधिकाऱ्यांनी सांगितले की, माण तालुक्‍यातील ढाकणी तलाव परिसरातील शेतकऱ्यांनी पैसे भरले आहेत.

पिंगळी तलाव परिसरात पिण्याच्या पाण्यासाठी पाणी सोडण्यात येत आहे. त्यावर श्रीमती सिंघल यांनी टंचाईबाबतचा प्रस्ताव अद्याप आपणापर्यंत पोहोचला नसल्याचा मुद्दा उपस्थित केला. अधिकाऱ्यांनी पाण्याचे पैसे देणाऱ्यांना अगोदर प्राधान्य द्यावे असे मत व्यक्त केले. यावेळी आंदोलकांवर गुन्हे मागे घेणे, आपले सरकार सुविधा केंद्र सुरू करण्यास होत असलेला विलंब व तालुक्‍यातील इतर प्रश्‍नांबाबत चर्चा झाली. विजय शिंदे, पुजारी, गोडसे, धनंजय क्षीरसागर, इंगवले आदींनी या चर्चेत भाग घेतला.

दरम्यान, आंदोलनकर्त्यांना पाठींबा देण्यासाठी शनिवार दि.1 डिसेंबर रोजी खटाव तालुका बंदची हाक देण्यात आली होती. मात्र जिल्हाधिकाऱ्यांच्या आश्‍वासनानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले आहे. त्यामुळे आज आयोजित केलेला बंद मागे घेण्यात आल्याचे आंदोलनकर्त्यांनी सांगितले


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)