येमेनमध्ये सौदी अरेबियाच्या हल्ल्यात २० नागरिक ठार

येमेन: सौदी अरेबियाच्या नेतृत्वाखाली येमेनमधल्या एका गावावर फायटर प्लेनने हवाई हल्ला केला. या कारवाईत २० नागरीक ठार झाले असल्याचे सांगण्यात येत आहे. गावात विवाहसोहळा सुरु असताना अचानक हा हवाई हल्ला झाला. विवाहसोहळयाला उपस्थित असणाऱ्या वहाऱ्डी मंडळींना या हल्ल्यात आपले प्राण गमवावे लागले.

या हल्ल्यात ४६ जण जखमी झाले असून यात ३० लहान मुलांचा समावेश आहे अशी माहिती अल जुमहोयुरी रुग्णालयाच्या प्रमुखांनी दिली. तर रुग्णालयात ४० मृतदेह आणण्यात आले होते. अनेकांच्या शरीराचे तुकडे झालेले होते. येमेनमधील हाऊथी बंडखोरांविरोधात सौदी अरेबियाचे मागच्या तीनवर्षांपासून युद्ध सुरु आहे. उत्तर येमेनमधील बहुतांश भागावर हाऊथी बंडखोरांचे नियंत्रण आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)