राहुल गांधी यांनी प्रसृत केले कैलास मानसरोवराचे छायाचित्र
नवी दिल्ली – कैलास मानसरोवर यात्रेवर असलेले कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी त्या तीर्थ स्थळावरील सरोवराचे एक छायाचित्र आपल्या ट्विटर वर प्रसृत केले असून त्यावर त्यांनी येथे द्वेष नाही असे वाक्‍य लिहुन भाजपला खिजवण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांनी म्हटले आहे की या सरोवराचे पाणी शांत, सुखद आणि आल्हाददायक आहे म्हणूनच भारतात या जलाचे पुजन केले जाते असे त्यांनी यात नमूद केले आहे. कैलास मानसरोवराच्या परिसराची दोन छायाचित्रे त्यांनी प्रसारीत केली आहेत.

कर्नाटकच्या प्रचार दौऱ्यावर असताना त्यांचे विमान अचानक काही फूट खाली आले होते व दुर्घटनाग्रस्त होताहोता वाचले होते त्यावेळीच त्यांनी कैलास मानसरोवर यात्रेला जाऊन तेथे दर्शन घेण्याची इच्छा प्रकट केली होती. या नवसपुर्तीसाठी ते या यात्रेवर आले आहेत. कैलास मानसरोवर हे शंभु महादेवाच्या वास्तव्याचे ठिकाण मानले जाते. हा भाग चीन मध्ये असून तेथे दरवर्षी जून ते सप्टेंबर या अवधीत यात्रा असते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)