येत्या २३ सप्टेंबरला जग संपूष्टात येणार…..?

नवी दिल्ली : सोशल मीडियावर सध्या जग संपणार अशी चर्चा सुरु झाली आहे. २३ सप्टेंबरला जग संपूष्टात येईल अशा चर्चा होत आहेत. २३ सप्टेंबरला एक ग्रह पृथ्वीला धडकणार असल्याचा दावा केला जात आहे. यामुळे पृथ्वीचा अंत होणार असल्याचे दावा केला जात आहे. पण वैज्ञानिकांना हा दावा फेटाळून लावला आहे.
‘प्लेनेट एक्स-द 2017 अराइवल’चे लेखक डेविड मीडे यांचा दावा आहे की, २३ सप्टेंबर २०१७ ला एक्स ग्रह निबेरू पृथ्वीला धडकणार आहे. वैज्ञानिकांनी मात्र यामध्ये कोणतेही सत्य वाटत नाही. डेविडचे म्हणणं आहे की, पवित्र धर्मग्रंथ बाय़बल वाचल्यानंतर तो त्याच्या दाव्यावर ठाम आहे. डेविड यासोबत आणखी काही पुस्तकांचा दाखल देखील देत आहे. ज्यामध्ये लिहिलं आहे की, ‘एक निर्दयी दिवस जवळ येत आहे. ज्यामध्ये क्रोध आणि भयंकर राग आहे. जो या धरतीचा विनाश करेल. डेविडच्या मते, ‘२१ ऑगस्टला अमेरिकामध्ये झालेलं पूर्ण सूर्यग्रहण याचा पुरावा आहे. धरतीचा विनाश जवळ आला आहे. निबेरू ग्रहावरील एलियन्सनेच माणवाला जन्म दिला होता अशी मान्यता आहे. एलियंस पहिल्यांदा आफ्रिकेत सोन्याची खाण खोदण्यासाठी पृथ्वीवर आले होते. यासाठी त्यांना काही लोकांची गरज होती म्हणून त्यांनी माणवाला जन्म दिला.’ अनेकदा असे दावे अनेकांकडून होत आले आहेत. पण वैज्ञानिकांनी मात्र त्याला कधीच दुजोरा दिला नाही. मात्र अशा गोष्टी नेहमी चर्चेचा विषय बनतात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)