येत्या पाच वर्षात मत्स्योत्पादन १० हजार कोटी रुपयांपर्यंत नेणार- मुख्यमंत्री

अलिबाग: राज्यात मासेमारीतून सध्या 6 हजार कोटी रुपयांचे उत्पन्न मिळते. येत्या पाच वर्षात राज्यात मत्स्य व्यवसाय सुविधा विकासाला प्राधान्य देऊन हे उत्पन्न 10 हजार कोटी रुपयांपर्यंत वाढविण्याचे उद्दिष्ट आपण गाठू, असा विश्वास राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज करंजा ता. उरण येथे व्यक्त केला.

करंजा ता.उरण येथील मत्स्यबंदर विकासाचे भूमिपूजन केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते आज करण्यात आले. या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. त्यावेळी फडणवीस बोलत होते.

-Ads-

कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांचे स्वागत पारंपरिक कोळी पद्धतीने ओवाळून करण्यात आले. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ वाढवून भूमिपूजन करण्यात आले. त्यानंतर प्रकल्प स्थळावर लावण्यात आलेली प्रकल्पाची माहिती मान्यवरांनी जाणून घेतली.

सभास्थानी आल्यावर उपस्थित मच्छिमार बांधवांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पारंपरिक कोळी पद्धतीची टोपी  परिधान करुन स्वागत केले. मच्छिमार बांधवांची होडीची प्रतिकृतीही भेट म्हणून देण्यात आली. त्यानंतर संपूर्ण प्रकल्पाचे सादरीकरण एका चित्रफितीद्वारे सभामंडपात दाखविण्यात आले. तसेच नीलक्रांती योजनेच्या माहिती पुस्तिकेचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)