येत्या दोन महिन्यात कॉंग्रेसचे लोकसभेचे उमेदवार निश्चित केले जाणार

भुवनेश्‍वर – कॉंग्रेस पक्ष पुर्ण तयारीनीशी सन 2019 च्या लोकसभा निवडणुकीला सामोरा जाणार असून पक्षाचे लोकसभा निवडणुकीचे उमेदवार येत्या दोन महिन्यात निश्चित केले जातील अशी माहिती ज्येष्ठ कॉंग्रेस नेते जितेंद्रसिंह यांनी आज येथे पत्रकार परिषदेत बोलताना दिली. ते म्हणाले की या निवडणुकीत कॉंग्रेस पक्ष प्रचंड पाठबळ मिळवून सत्तेवर येईल.

उमेदवार निवडीत पात्रता हा सर्वात महत्वाचा निकष असणार आहे तसेच महिला आणि युवकांनाहीं यात मोठे स्थान दिले जाणार आहे असे त्यांनी नमूद केले. ओडिशा प्रदेश कॉंग्रेस समितीची नुकतीच पुनर्रचना करण्यात आली असून ही समिती लोकसभा निवडणुकीत ओडिशात महत्वाची कामगिरी नोंदवेल असा विश्‍वासही त्यांनी व्यक्त केला. ओडिशातील नवीन पटनाईक सरकारच्या कारभारावरही त्यांनी जोरदार टीका केली ते म्हणाले की या सरकारच्या काळात शेतकरी, महिला, दलित आणि उपेक्षित वर्गाच्या समस्यांमध्ये वाढच झाली आहे. त्यांचे दिवस आता भरले आहेत असा आरोपही त्यांनी केला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)