येत्या काही दिवसात पेट्रोल, डिझेलचे दर कमी होणार…

नवी दिल्ली :   पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत होणाऱ्या दरवाढीमुळे जोरदार टीका झाल्यानंतर सरकार आता खडबडून जागं झालं आहे. या संदर्भात पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी इंडियन ऑईल, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्तान पेट्रोलियम या तेल कंपन्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती.
ऑगस्ट महिन्यात अमेरिकेत दोन मोठी वादळं आली. यामुळे कच्च्या तेलाच्या किंमती तर वाढल्याच, शिवाय जागतिक स्तरावर रिफायनरी क्षमता 13 टक्क्यांनी कमी झाली. या सर्व कारणांमुळे पेट्रोलचे आंतरराष्ट्रीय दर 18 टक्क्यांनी आणि डिझेलचे आंतरराष्ट्रीय दर 20 टक्क्यांनी वाढले. त्यामुळे भारतातही पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढले, अशी माहिती धर्मेंद्र प्रधान यांनी दिली.
पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती आता स्थिर झाल्या आहेत. बुधवारीही पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर असल्याचं दिसून आले. त्यामुळे आता पुढेही दर कमी होतील. कारण जागतिक स्तरावरील परिस्थितीही सामान्य झाली आहे. शिवाय नैसर्गिक आपत्तींचाही आता धोका नाही, असं धर्मेंद्र प्रधान म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)