येत्या काही तासात पावसाचा जोर वाढणार – हवामान विभाग

मुंबई : मुंबईला यंदाच्या सर्वात मोठ्या पावसाने अक्षरश: झोडपून काढल्याचे दिसत आहे. मुंबईसह राज्यात पावसाने चांगलीच हजेरी लावली आहे. दरम्यान, पावसाचा जोर आणखी वाढला आहे. येत्या काही तासात आणखी पाऊस वाढण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. रात्रीपासून कोसळणाऱ्या पावसामुळे रस्ते, रेल्वे, हवाई अशी सर्व वाहतूक ठप्प झाली आहे.
मुंबईसोबतच राज्यभरातही मुसळधार पाऊस सुरु आहे. विदर्भ, मराठवाडा, कोकण आणि उत्तर महाराष्ट्रात जोरदार पाऊस सुरु आहे. तर पश्चिम महाराष्ट्रात तुरळक ठिकाणीच पावसाने हजेरी लावली आहे. मराठवाड्यात गेल्या चार दिवसांपासून सुरु असलेल्या पावसामुळे सर्व लहान आणि मध्यम प्रकल्प भरले आहेत.
विदर्भात नागपूर, अकोला, वर्धा जिल्ह्यात मुसळधार पाऊस आहे. मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यात गेले 4 दिवस पाऊस सुरु आहे. बीड, लातूर उस्मानाबाद जिल्ह्यांत मुसळधार पाऊस आहे. सर्व लहान आणि मध्य प्रकल्प पाण्याने भरले आहेत.
नाशिकमध्ये कालपासून मुसळधार पाऊस आहे. या सततच्या पावसामुळे गोदावरी नदीला पूर आला आहे. तर सर्व धरणे भरली आहेत. गोदावरीच्या पाण्याचा प्रवाह वाढल्याने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला. मुंबईप्रमाणेच कोकणालाही पावसाने झोडपले आहे. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेल्या 24 तासांपासून मुसळधार पाऊस सुरु आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)