येत्या काळात मेडिकल टूरिझम क्षेत्रात भारत आघाडीवर : डॉ.प्रदीप महाजन

पुणे,दि.12 – विकसित देशांमधील वैद्यकीय सेवांचा वाढता खर्च, वेगाने वृध्द होणारी लोकसंख्या यामुळे भारतात मेडिकल टुरिझम क्षेत्र झपाट्याने वाढत आहे. लोकं भारतात कर्करोग चिकित्सा, हदयशस्त्रक्रिया, दंतचिकित्सा व सौंदर्यप्रसाधन चिकित्सा इत्यादींसाठी येत आहेत. कारण याचा खर्च भारतात त्या देशांच्या तुलनेने कमी आहे. यामुळे येत्या काळात मेडिकल टूरिझम क्षेत्रात भारत आघाडीवर असेल, असे मत ट्रान्स एशिया चेंबर ऑफ कॉमर्सच्या मेडिकल टूरिझम विभागाचे अध्यक्ष डॉ.प्रदीप महाजन यांनी व्यक्त केले.
आयबेक्‍स न्यु कन्सेप्टस प्रा.लि.तर्फे वैद्यकीय क्षेत्रातील माहिती देणाऱ्या संकेतस्थळाचे अनावरण नुकतेच झाले या कार्यक्रमात ते बोलत होते. या संकेतस्थळाद्वारे योगा,आयुर्वेद सारख्या भारतीय संकल्पना, भारतात तयार होणारी वैद्यकीय उपकरणे, मेडिकल टुरिझम याबाबतचा माहितीसाठा असेल. ज्यामुळे भारत आणि इतर देशांत आरोग्य सेवा क्षेत्रात संबंध अधिक दृढ होण्यास मदत होईल.
डॉ.प्रदीप महाजन म्हणाले की, विकसित देशांमधील लोकांच्या आरोग्यविषयक गरजांची पूर्तता करण्यासाठी मेडिकल टूरिझम हे प्रवेशद्वार आहे. 2015 मध्ये 4 लाख व्हिसा देण्यात आले होते, तर 2017 मध्ये हा आकडा 5 लाखांवर गेला. 2020 पर्यंत मेडिकल टुरिझम या क्षेत्राची भारतातील व्याप्ती 8 बिलियन डॉलर्स इतकी होईल. सध्या इतर देशांतून भारतात वैद्यकीय चिकित्सेसाठी येणाऱ्या लोकांमध्ये 65 टक्‍क्‍यांहून अधिक महाराष्ट्र व तमिळनाडूमध्ये जातात. उच्च कौशल्य असलेले डॉक्‍टर्स व मनुष्यबळ तसेच संवाद कौशल्य यामुळे मेडिकल टूरिझम क्षेत्रात भारत येत्या काळात आघाडीवर असेल.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)