येत्याकाळात देशात एकाचवेळी निवडणुका घेण्याची गरज- रामनाथ कोविंद

नवी दिल्ली : देशात वारंवार होणाऱ्या निवडणुकांमुळे विकासावर विपरित परिणाम होत असल्याचं प्रतिपादन आज राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी केलं. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या सुरुवातील आज दोन्ही सभागृहांच्या संयुक्त बैठकीत राष्ट्रपतींचं अभिभाषण झालं. त्यावेळी राष्ट्रपती बोलत होते.

भाषणात मोदी सरकारनं केलेल्या कामांची यादी वाचून दाखवली. त्याचप्रमाणे येत्याकाळात देशात एकाचवेळी निवडणुका घेण्याची गरज असल्याचंही बोलून दाखवलं. सरकारनं या दृष्टीनं समाजाच्या विविध घटकांसोबत चर्चा करावी,त्याप्रमाणे सर्वपक्षीयांमध्येही सहमती निर्माण करावी असं कोविंद यांनी म्हटलंय.


-Ads-

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)