येतेय मल्टिस्टार चित्रपटांची लाट (भाग ३)

येतेय मल्टिस्टार चित्रपटांची लाट (भाग२)

चक रसेलच्या “जंगली’ चित्रपटाचे सर्वात मोठे आकर्षण आहे ते विद्युत जामवाल. त्यासोबत आहेत अतुल कुलकर्णी, मकरंद देशपांडे, पूजा सावंत. आनंद एल. राय चा मुदस्सर अजीज दिग्दर्शित “हॅपी भाग जाएगी’ हा चित्रपट 2016 मध्ये प्रदर्शित झाला होता. या विनोदी चित्रपटाच्या पुढच्या भागात सोनाक्षी सिन्हा, जस्सी गिल, डायना पेंटी, जिमी शेरगिल आणि अली फजल यांच्यासमवेत परदेशी कलाकारही आहेत. आनंद एल. राय दिग्दर्शित “झीरो’ हा चित्रपट शाहरुख साकारत असलेल्या ठेंगण्या व्यक्‍तीच्या व्यक्‍तिरेखेमुळे चर्चेत आहे. या चित्रपटात शाहरुखसोबत अनुष्का शर्मा, कतरिना कैफ, अभय देओल आणि तिग्मांशु धुलिया तसेच सलमान खान, दीपिका पदुकोण, राणी मुखर्जी, काजोल, आलिया भट्ट, करिश्‍मा कपूर, जुही चावला आणि आर.माधवन अशी कलाकारांची भली मोठी फौज असणार आहे. निर्माता – दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर देखील “मोहेजोंदारो’ च्या अपयशानंतर मागे न हटता पानिपतच्या तिसऱ्या युद्धावर आधारित “पानिपत’ या चित्रपटाची निर्मिती करत आहे. यामध्ये संजय दत्त, अर्जुन कपूर, कृति सेन, कबीर बेदी इत्यादी कलाकारांचा समावेश आहे.

साजिद नाडियादवालाच्या “हाऊसफुल’ चित्रपटाच्या सीरीजमध्ये तर अनेक कलाकार दिसतात. याच सीरीजमधला 4 था भाग येऊ घातला आहे. या चित्रपटात अक्षय कुमार, रितेश देशमुख, बॉबी देओल, चंकी पांडे, बोमन इराणी, कृती सैनन, कृृती खरबंदा आणि पूजा हेगडे यासारखे कलाकार चमकणार आहेत. सलमान खानच्या बहुचर्चित “भारत’ मधून प्रियांका चोप्रा बाहेर पडली असली तरी अनेक सिताऱ्यांची गर्दी कमी झालेली नाही. चित्रपटात कतरिना कैफ आणि सलमान खान या प्रसिद्ध जोडीसह सुनील ग्रोवर, दिशा पटानी, तब्बू, नोरा फतेही आणि सतीश कौशिक यांनाही सामील केले आहे.

कलाकारांची यादी आणखीही वाढण्याची शक्‍यता आहे! एक नायक, एक नायिका, एक खलनायक आणि जोडीला साहाय्यक कलाकार अशा चार पायांवर आधारलेल्या चित्रपटांच्या निर्मितीचा खर्च आणि मल्टिस्टारर चित्रपटांसाठी येणारा खर्च यामध्ये अर्थातच फरक असतो. मल्टिस्टारर चित्रपट हे बिग बजेट असणे स्वाभाविक असते. कारण नावाजलेल्या कलाकारांचे मानधनाचे आकडेही “नावाजलेले’ असतात. पण इतका प्रचंड पैसा खर्च करूनही जेव्हा रद्दड कथानक अथवा सुमार मांडणीमुळे किंवा सादरीकरणातील रटाळपणामुळे चित्रपट आपटतो तेव्हा निर्मात्यांचे मोठे नुकसान होते. इतिहासात डोकावल्यास असे अनेक चित्रपट आढळतात, ज्यांमध्ये दिग्गज, नावाजलेले कलाकार असूनही प्रेक्षकांनी त्यांकडे पाठ फिरवली. “जानी दुश्‍मन, ” डरना जरुरी है’, “युवा’, “चॉकलेट’, “बाबूल’, “एलओसी’, “फाईंडिंग फॅनी’, मिशन इस्तंबूल, थॅंकयू, प्लेयर्स, किल- दिल, फितूर’ “आरक्षण,’ “टशन’, “हमशकल’ यांसारख्या चित्रपटांना तिकीट खिडकीवर मोठा फटका बसला. अशी स्थिती आगामी काळात येणाऱ्या मल्टिस्टारर चित्रपटांची होणार नाही, अशी अपेक्षा बाळगूया.

सोनम परब


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
1 :thumbsup:
0 :heart:
1 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)