येतेय मल्टिस्टार चित्रपटांची लाट ( भाग २ )

येतेय मल्टिस्टार चित्रपटांची लाट (भाग१)

मल्टिस्टारर चित्रपटांचा सिलसिला
एक मुख्य अभिनेता आणि इतर बडे कलाकार असे मल्टिस्टारर चित्रपट इतर निर्मात्यांनीही केले आहेत. आदित्य चोपडा आणि यशराज फिल्मस हे याचे दुसरे उदाहरण. या बॅनर अंतर्गत विजय कृष्ण आचार्य दिग्दर्शित “ठग्ज ऑफ हिंदुस्थान’ची प्रेक्षक औत्सुक्‍याने वाट पाहात आहेत. कारण या चित्रपटात अमिताभ बच्चन, आमिर खान, कतरिना कैफ, जॅकी श्रॉफ आणि फातिमा सना शेख सारखे बडे सितारे सामील आहेत. या चित्रपटात काही परदेशी कलाकारही आहेत. सिद्धार्थ आनंदच्या दिग्दर्शनांतर्गत असलेला रॅम्बो हा चित्रपट ऍक्‍शन क्राईम ड्रामा आहे. यात हृतिक रोशन, टायगर श्रॉफ, संजय दत्त आणि वाणी कपूरही असतील. “एक लडकी को देखा तो ऐसा लगा’ हा निर्माता विधू विनोद चोप्रा याचा असाच बहुकलाकारांचा चित्रपट. नवोदित दिग्दर्शक शैली चोक्रधर दिग्दर्शित या चित्रपटात अनिल कपूर, जुही चावला, सोनम कपूर, राजकुमार राव, रिजायना कैसांद्रा (दक्षिणेकडील कलाकार), मधुमालती कपूर इत्यादी कलाकार आहेत. हा चित्रपट विशेष चर्चेत आहे.

दक्षिणेकडील अवाढव्य बजेट असलेले चित्रपट बनवणारा दिग्दर्शक कृषचा “मणकर्णिका द क्वीन ऑफ झांसी’हा पहिल्या स्वातंत्र्ययुद्धावर केंद्रित चित्रपट आहे. या चित्रपटात कंगना राणावत, सोनू सूद, अंकिता लोखंडे, अतुल कुलकर्णी, जीशुआ सेनगुप्ता, सुरेश ओबेरॉय हे कलाकार विविध ऐतिहासिक पात्रे रंगवत आहेत. “यमला पगला दीवाना’ ही 2011 मध्ये सुरू झालेली ही चित्रपटांची मालिका. त्याच्या तिसऱ्या भागात धर्मेंद्र, सनी देओल, बॉबी देओल ही तिकडी धमाल करताना दिसणार आहे. त्यांच्यासमवेत कृति खरबंदा, जॉनी लिव्हर, असरानी, सतीश कौशिक असणार आहेत. तसेच चित्रपटात शत्रुघ्न सिन्हा, सोनाक्षी सिन्हा, सलमान खान, गिप्पी ग्रेवा आणि रेखा ही स्टारकास्ट पाहुण्या कलाकारांच्या भूमिकेत दिसणार आहे.

काही मल्टिस्टारर चित्रपट असेही आहेत ज्यांमधील कलाकार हे खूप नावाजलेले नाहीत. मात्र तरीही ते आपल्या कलेत वाकबगार आहेत. त्यांना पुनःपुन्हा पाहण्याची प्रेक्षकांना इच्छा असते. त्या प्रेक्षकांसाठी या कलाकारांना घेऊन चित्रपट केले जातात. प्रीतिश चक्रवर्तीचा “मंगल हो’ मध्ये संजय शर्मा, अन्नू कपूर, व्रजेश हिरजी, मुकेश भट्ट, आरिफ शेख आणि मुरली शर्मा चित्रपटात प्रेक्षकांना हसवणार आहेत. त्याशिवाय शैलेश वर्माच्या “नास्तिक’मध्ये अर्जुन रामपाल, टीनू आनंद, मीरा चोपडा, रवि किशन, दिव्या दत्ता, ईहाना ढिल्लो आणि हर्षाली मल्होत्रा आहेत. तिग्मांशू धुलियाचा चित्रपट “मिलन टॉकीज’, आशुतोष चौबेचा चित्रपट “सोन चिडिया’ या चित्रपटांमध्येही मध्यम दर्जाची स्टार कास्ट आहे. ही स्टारकास्ट गर्दी खेचते.

 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)