येणपे घटनेतील संशयीतास आणखी तीन दिवस कोठडी

कराड, दि. 4 (प्रतिनिधी)- येणपे (ता. कराड) येथील विवाहितेवर अत्याचार करून तिचा खून केल्याप्रकरणी दाखल असलेल्या गुन्ह्यातील मुख्य संशयित करण कोळी याला मंगळवारी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यास आणखी तीन दिवस पोलीस कोठडी सुनावली. विवाहितेवर अत्याचार करून तिचा खून केल्याप्रकरणी तालुका पोलिसांनी मुख्य संशयीत करण कोळी व अन्य एका अल्पवयीन मुलास ताब्यात घेतले होते. मुख्य संशयीतास अटक करून न्यायालयात हजर केल्यानंतर त्यास 7 दिवस पोलीस कोठडी सुनावली होती. पोलीस कोठडीची मुदत संपल्याने मंगळवारी पुन्हा त्याला न्यायालयात हजर केले असता दि. 7 पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिला. या गुन्ह्याचा तपास डीवायएसपी नवनाथ ढवळे करत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)