येणपे घटनेतील संशयिताचे वकिलपत्र न घेण्याचे आवाहन

कराड, दि. 3 (प्रतिनिधी) -?येणपे (ता. कराड) येथे घडलेली घटना गंभीर आणि मानवतेला काळीमा फासणारी आहे. या घटनेतील संशयीत आरोपींचे कोणीही वकीलपत्र स्वीकारू नये, अशा मागणीचे निवेदन सकल मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने कराड बार असोसिएशनला देण्यात आले. येणपे येथील घटनेचा समाजातील सर्वच स्तरातून निषेध होत आहे. संशयीतांचे कृत्य निंदनीय आणि भयंकर आहे. या नराधमांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे. समाजात अनेक गुन्हे घडतात. गुन्हे पैशाच्या जोरावर काही दिवसांनी सुटतातही आणि यात अडकतात ते ज्यांच्याबाबत गुन्हा घडला आहे तेच लोक. येणपे येथील महिलेला न्याय मिळवून देण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे. या घटनेतील संशयीतांचे वकिलांनी वकीलपत्र स्वीकारू नये, असे मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने कराड बार असोसिएशनला देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)