अत्याचारानंतर गावात राडा

कराड, दि. 30 (प्रतिनिधी)-येणपे (ता. कराड) येथील विवाहितेवर अत्याचार करून तिचा खून केल्याच्या घटनेचे गुरूवारी गावात हिंसक पडसाद उमटले. संतप्त जमावाने संशयीताच्या घरावर हल्ला करून दोघांना जबर मारहाण आणि वाहनांची मोडतोड करण्यात आली. या राड्याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या परस्पविरोधी फिर्यादींवरून दोन्ही बाजूच्या 50 जणांवर खुनी हल्ला, विनयभंग आणि मारहाणीचा गुन्हा दाखल झाला आहे.
राहूल संजय पवार यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, महिलेचा खून करणारा तुमच्यातला आहे, असे म्हणून 30 ते 40 जणांनी घरावर हल्ला करून दार मोडले. वाहनांची मोडतोड केली. घरात घुसून मारहाण केली. या फिर्यादीवरून 30 ते 40 जणांवर बेकायदा जमाव जमवून खुनी हल्ला, विनयभंग केल्याचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या गुन्ह्याचा तपास सपोनि शिंदे करत आहेत.
सागर श्रीपती जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, आमच्याकडे वस्तीकडे का आलास? इकडे का फिरतोस, असे म्हणून 9 ते 10 जणांनी आपल्या मारहाण केली. या फिर्यादीवरून 9 ते 10 जणांवर मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)